मुंबई : शाहरुख खानच्या आगामी झिरो सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे टीझरमध्ये शाहरुखसोबत सलमान खान दिसत आहे. इतकंच नाही तर सलमानने शाहरुखला कवेत उचलूनही घेतलं आहे. शाहरुख खानने सकाळी 11 वाजून 48 मिनिटांनी ट्विटरवर सिनेमाचा टीझर शेअर केला.


झिरो चित्रपटातून शाहरुख पहिल्यांदाच बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट यंदा डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात शाहरुख खानसोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ प्रमुख भूमिकेत आहेत.


सिनेमाच्या टीजरची सुरुवात प्रशिद्ध शायर मजरुह सुलतानपुरी यांच्या शेरने होते. "मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया. यानंतर  कतरिना कैफचा फोटो असलेला टी शर्ट परिधान केलेल्या शाहरुख खानची एण्ट्री होते. शाहरुख खानच्या व्यक्तिरेखेचं नाव बऊआ स‍िंह आहे.

बॅकग्राऊंडमध्ये जावेद जाफरीचा आवाज आहे. मग सलमान खानची एण्ट्री होते आणि सलमान चित्रपटाचा पहिला डायलॉग बोलतो, 'सुना है जिसके पीछे लग जाते हो लाईफ बना देते हो.'

टीझरमध्ये सलमान खान-शाहरुख खान गळ्यात लाल गमछा घालून देसी अंदाजात थिरकतात. आनंद एल रॉय हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 21 डिसेंबरला सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

पाहा टीझर