अभिनेता अरबाज खानने आयपीएलमधील सामन्यांवर सट्टेबाजी केल्याची कबुली दिली आहे. गेल्या पाच वर्षांपासून अरबाज बुकी सोनू जलानच्या संपर्कात होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांवर आपण आतापर्यंत सट्टा लावला असून बेटिंगमध्ये काही वेळा जिंकल्याचीही कबुली अरबाजने दिली. मात्र आपल्या कुटुंबाला सट्टा लावणं पसंत नसल्याचंही अरबाज म्हणाला.
आपण बेटिंगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र बुकी सोनू जलानने जुनी रेकॉर्डिंग्स ऐकवून ब्लॅकमेल केलं, दबाव आणला, असा दावा अरबाजने केला आहे.
आयपीएल बेटिंग : दिग्दर्शक साजिद खानचाही सहभाग?
अरबाजवर दबाव आणून त्याचे पैसे सोनूने गुंतवल्यामुळे अरबाज थेट आरोपी होत नाही, त्यामुळे अरबाजला बेटिंग प्रकरणात पोलिसांनी मुख्य साक्षीदार केलं.
आयपीएल सामन्यांवरील बेटिंग प्रकरणात ठाणे खंडणीविरोधी पथकाने अरबाजला समन्स बजावलं होतं. ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात झालेल्या चौकशीत अरबाजने ही कबुली दिली.
आयपीएलमध्ये बेटिंग केल्याची अरबाज खानची कबुली
चौकशीला जाण्यापूर्वी अरबाज खानने गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये जाऊन सलमानची भेट घेतली होती. दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली. खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात अरबाजसोबत सलमानचा बॉडीगार्ड शेरा आणि वकील होते.
ठाणे खंडणीविरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी आयपीएल सामन्यांवर सुरु असलेलं ऑनलाईन बेटिंगचं रॅकेट उघड करत डोंबिवलीतून तिघांना अटक केली होती. त्यानंतर या तिघांच्या चौकशीत हे रॅकेट देशातला आघाडीचा बुकी सोनू जालान उर्फ सोनू मालाड चालवत असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी सोनूला बेड्या ठोकल्या.
आयपीएल बेटिंग प्रकरणी अरबाज खानला समन्स
सोनूच्या चौकशीत अभिनेता अरबाज खान हा देखील सोनूकडे बेटिंग करत असल्याची माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी अरबाज खानला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावलं होतं.
दरम्यान, सोनूच्या संपर्कात देशातले 80 ते 90 बडे बुकी आणि अनेक सेलिब्रेटी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लवकरच खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात बड्या असामींची हजेरी लागण्याची शक्यता आहे.