शिर्डी : शाहरुख खानचा (Shahrukh Khan) डंकी (Dunky) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी शाहरुख हा शिर्डीत (Shirdi) साई दर्शन घेण्यासाठी दाखल झाला. यावेळी शिर्डीत शाहरुखला बघताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. तसेच शाहरुखने फ्लाईंग किस करत चाहत्यांना अभिवादन देखील केले. यावेळी शाहरुखसोबत त्याची मुलगी सुहाना देखील होती.  शाहरुखचा डंकी हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. पठाण' (Pathaan) आणि 'जवान' (Jawan) या बॅक टू बॅक सुपरहिट सिनेमानंतर 'डंकी' या सिनेमाच्या माध्यमातून किंग खान रुपेरी पडदा पुन्हा एकदा गाजवणार आहे. 'डंकी' या सिनेमाचा रिलीजआधीच जगभरात बोलबाला पाहायला मिळत आहे. 


दरम्यान याआधीच शाहरुखने  वैष्णो देवीचे दर्शन घेतले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाला. या व्हिडीओमध्ये किंग खान आपली मॅनेजर पूजा ददलानीसोबत दिसत होता. शाहरुख खान या वर्षात तिसऱ्यांदा वैष्णो देवीच्या दर्शनाला गेला आहे. 'पठाण' आणि 'जवान'च्या रिलीजआधी शाहरुख खान वैष्णो देवीच्या दर्शनाला गेला होता. 


'डंकी' येणार प्रेक्षकांच्या भेटीला


शाहरुख खान अभिनीत 'डंकी' या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. राजकुमार हिरानी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'डंकी' हा सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात शाहरुखसह तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन ईरानी आणि विक्रम कोचर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 120 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 'डंकी' या सिनेमाची प्रभास आणि प्रशांत नीलच्या 'सालार' या सिनेमासोबत टक्कर होणार आहे.


'पठाण' आणि 'जवान'पेक्षा 'डंकी' या सिनेमाचे सर्वाधिक शो ठेवण्यात आले आहेत. जगभरात अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या सिनेमाचे जगभरात 5500 तिकिटे विकले गेले असल्याची माहिती आहे. भारतात लवकरच या सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग सुरू होईल.


शाहरुखच्या 'डंकी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी सांभाळली आहे. राजकुमार हिरानी यांच्यासोबत शाहरुखने पहिल्यांदाच एकत्र काम केलं आहे. हिरानी यांचे 'मुन्नाभाई एमबीबीएस', '3 इडियट्स' आणि 'पीके' असे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. त्यामुळे आता 'डंकी' या सिनेमाकडून सिनेप्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत. 


 



हेही वाचा : 


Shah Rukh Khan : 'डंकी'च्या रिलीजआधी शाहरुख खान वैष्णो देवीच्या दर्शनाला; व्हिडीओ व्हायरल