Sher Shivraj : 'शेर शिवराज' हा सिनेमा 22 एप्रिल 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. ढोल-ताशांचा गजर, शाहिरी पोवाडे, डफाची थाप, गोंधळ, जागरण आणि छत्रपती शिवरायांचा जयघोष अशा भारावलेल्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात 'शेर शिवराज'सिनेमातील कलाकारांचे साताऱ्यातील नागरिकांनी जंगी स्वागत केले आहे. 


प्रतापगडावरील भवानीमातेचा आशीर्वाद घेत इतिहासाचे आणि चित्रपटातील किस्स्यांचे अनेक पैलू प्रतापगडावर सिनेमातील कलाकारांनी उलगडले. अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, विक्रम गायकवाड, अक्षय वाघमारे आणि निर्माते प्रद्योत पेंढरकर, नितीन केणी हे कलाकार दरम्यान उपस्थित होते. 


शिवचरित्रातील अफजलखान वधाच्या महत्त्वपूर्ण अध्यायामध्ये प्रतापगडाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. लेखक–दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी दरम्यान प्रतापगड आणि अफजलखान वधाच्या चित्तथरारक घटनाक्रमाची माहिती दिली. 


'शेर शिवराज' सिनेमात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, वर्षा उसगांवकर, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, आस्ताद काळे, सुश्रूत मंकणी, दीप्ती केतकर, माधवी निमकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.






'शेर शिवराज'चे नवे पोस्टर प्रदर्शित 


'शेर शिवराज'चे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरमधून बहिर्जी नाईकांचा लूक समोर आला आहे. 'शेर शिवराज' सिनेमात दिग्पाल लांजेकर बहिर्जी नाईकांच्या भूमिकेत आहेत. दिग्पाल लांजेकरांनी सोशल मीडियावर या सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे.


संबंधित बातम्या


KGF 2 : 'केजीएफ 2'च्या प्री-बुकिंगला सुरुवात, 12 तासांत पाच हजार तिकिटांची विक्री


Anand Math : बंकिमचंद्र चटर्जींच्या ‘आनंदमठ’चा रिमेक येणार, नव्या वर्षांत चित्रपट प्रदर्शित होणार!


Alia-Ranbir Wedding : आलिया भट्ट बनणार रणबीर कपूरची ‘नवरी’! ‘हा’ प्रसिद्ध डिझायनर बनवणार लग्नाचा पेहराव!