Shah Rukh Khan Video Viral : बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानला (Shah Rukh Khan) लॉस एंजेलिसमध्ये शूटिंग करताना दुखापत झाली असून लगेचच त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती समोर आली. पण आता शस्त्रक्रियेनंतर किंग खान मायदेशी परतला आहे. आज पहाटे (5 जुलै) मुंबई विमानतळावर पत्नी गौरी खानसह (Gauri Khan) त्याला स्पॉट करण्यात आलं आहे. 


शाहरुख खानचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो पत्नी गौरी खान आणि लेक अबरामसोबत दिसत आहेत. दरम्यान पापराझींनी त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. पण किंग खानने काहीही उत्तर दिलं नाही आणि घाईत गाडीत जाऊन बसला. पण शाहरुखला फिट पाहून चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.






शाहरुख खान अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये त्याच्या आगामी सिनेमाचं शूटिंग करत होता. दरम्यान त्याच्या चेहऱ्याला आणि नाकाला दुखापत झाली आणि रक्तस्त्राव सुरू झाला. रक्त थांबवण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली. ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, शस्त्रक्रियेनंतर किंग खान आता भारतात परतला आहे. 


शाहरुख खानला शूटिंगदरम्यान अनेकदा दुखापत


शाहरुखला आजवर अनेकदा शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे. 'चैन्नई एक्सप्रेस' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान 2013 साली शाहरुखची आठ वेळा शस्त्रक्रिया झाली होती. त्याआधी 2009 साली उजव्या खांद्याला दुखापत झाल्याने त्याी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तसेच 2017 साली 'रईस' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान शाहरुखच्या चेहऱ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. 


शाहरुखच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Shah Rukh Khan Upcoming Movies)


बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 7 सप्टेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच 'डंकी' (Dunky) आणि 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमातही शाहरुखच्या अभिनयाची झलक पाहायला मिळणार आहे. तसेच सलमानसोबत 'टायगर वर्सेस पठाण' या सिनेमातही तो झळकणार आहे. लवकरच या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार असून 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुखच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan Accident : शाहरुख खानचा अमेरिकेत अपघात; नाकाला झाली दुखापत, डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया