Pathaan: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) आणि झुमे जो पठाण ही गाणी प्रदर्शित झाली होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकताच हा ट्रेलर दुबईमधील बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) झळकला आहे.
यश राज फिल्म्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन बुर्ज खलिफाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 'पठाण ऑन टॉप लिटरली, 25 जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर पठाण पाहा. हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीस' असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. यश राज फिल्म्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या बुर्ज खलिफाच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. या ट्वीटला 13 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी लाइक केलं आहे. तर चार हजारपेक्षा जास्त युझर्सनं या ट्वीटला रिट्वीट केलं आहे.
पाहा व्हिडीओ:
गेल्यावर्षी शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त देखील बुर्ज खलिफावर त्याचे फोटो झळकले होते. 2021 मध्ये देखील शाहरुखच्या वाढदिवसाला बुर्ज खलिफावर त्याचे फोटो झळकले होते.
पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: