Shah Rukh Khan: गेल्या वर्षी शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) , डंकी (Dunki) आणि जवान (Jawan) हे सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. तिन्ही चित्रपटांनी बंपर कमाई केली. शाहरुखने काल (29 जानेवारी) 'डंकी' या चित्रपटाच्या सक्सेस मीटचे आयोजन केले होते, ज्यामध्ये शाहरुख हा चाहत्यांना भेटला होता. 'डंकी' या चित्रपटाच्या सक्सेस मीटमध्ये शाहरुखला भेटताच एका चाहता थरथर कापायला लागला. शाहरुखने त्या चाहत्याला ज्या पद्धतीने भेटला, त्याचे अनेकांनी कौतुक केले.


शाहरुखच्या चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल


डंकी या चित्रपटाच्या फॅन मीटमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक शाहरुखचा चाहता स्टेजवर आलेला दित आहे. हा चाहता शाहरुखशी बोलताना थरथरू लागतो आणि भावूक होतो.


शाहरुखला पाहताच भावूक झाला चाहता


डंकी या चित्रपटाच्या फॅन मीटमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक शाहरुखचा चाहता स्टेजवर आलेला दित आहे. हा चाहता शाहरुखशी बोलताना थरथरू लागतो आणि भावूक होतो.शाहरुखने त्या चाहत्याचा हात धरला, त्याचे सांत्वन केले आणि त्याला मिठी मारली. त्यानंतर शाहरुखनं त्या चाहत्यासोबत फोटोसाठी पोज दिली. यावेळी चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू येत होते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी शाहरुखचं कौतुक करत आहे.


शाहरुखच्या या व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'शाहरुख ज्या प्रकारे लोकांचा आदर करतो ते उदाहरण देते की मानव जात अजूनही अस्तित्वात आहे.' 


पाहा व्हिडीओ:






डंकीला मिळाली प्रेक्षकांची पसंती


 'डंकी' हा चित्रपट 21 डिसेंबर 2023 रोजी रिलीज झाला. राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. या चित्रपटात शाहरुख व्यतिरिक्त विकी कौशल, तापसी पन्नू, सतीश शाह, अनिल ग्रोवर, बोमन इराणी आणि विक्रम कोचर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला आणि चित्रपटाच्या कथेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. प्रेक्षक आता शाहरुखच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


 Dunki Movie Review: शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी यांचा 'डंकी' खळखळून हसवेल आणि भावूकही करेल; वाचा रिव्ह्यू