Lahore 1947 : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सध्या चर्चेत आहे. सनी देओलचा 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमानंतर सनीला अनेक सिनेमांच्या ऑफर यायला सुरुवात झाली. सनीचा 'लाहौर 1947' (Lahore 1947) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात एका बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.


सनी देओल सिने-दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बिग बजेट 'रामायण' या सिनेमात झळकणार असल्याची चर्चा होती. या सिनेमात अभिनेता हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमासह सनीचं नाव आमिर खान आणि राजकुमार संतोषी यांच्या 'लाहौर 1947' या सिनेमासोबत जोडलं जात आहे. अद्याप या सिनेमासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अभिनेत्री प्रीती झिंटादेखील (Preity Zinta) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. प्रीतीसह आणखी एक अभिनेत्री या सिनेमाचा भाग असणार असल्याचं म्हटलं जात आहे.


'लाहौर 1947'मध्ये 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री!


आमिर खान प्रोडक्शन हाऊस बॅनरअंतर्गत 'लाहौर 1947' या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आता या सिनेमासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. प्रीती झिंटा या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. आता जूमच्या रिपोर्टनुसार, 'लाहौर 1947'मध्ये शबाना आझमीदेखील (Shabana Azmi) झळकणार आहेत. शबाना आझमी या सिनेमात एका हिंदू महिलेच्या भूमिकेत झळकणार आहेत. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 'लाहौर 1947' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.


शबाना आझमींबद्दल जाणून घ्या... (Shabana Azmi Details)


शबाना आझमी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. 1947 मध्ये तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. दरम्यान तिने समांतर सिनेमातही काम केलं. अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यात राष्ट्रीय पुरस्कारांचाही समावेश आहे. अंकुर, अमर अकबर हीरा और पत्थर, परवरिश, आधा दिन आधी रात, स्वामी, देवता, जालिम, अतिथि ,स्वर्ग-नरक, थोड़ी बेवफाई स्पर्श अमरदीप, बगुला-भगत, अर्थ, एक ही भूल हम पांच, अपने पराये, मासूम, लोग क्या कहेंगे, कल्पवृक्ष, पार, कामयाब, द ब्यूटीफुल नाइट, मैं आजाद हूँ, इतिहास, मटरू की बिजली का मंडोला अशा अनेक सिनेमांत तिने काम केलं आहे.


संबंधित बातम्या


Preity Zinta : प्रीती झिंटा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार, सनी देओल सोबत पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार