Shah Rukh Khan Jawan Atee Kumar : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. सरकारी नोकरी असली की मुलांना ही अशी सुंदर बायको भेटते, असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं होतं. सोशल मीडियावर हा फोटो आणि पोस्ट तुफान व्हायरल झाला. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला. खरं तर या फोटोतला तरुण हा कोणी सामान्य व्यक्ती नसून 'जवान' या बहुचर्चित सिनेमाचा दिग्दर्शक अॅटली कुमार (Atlee Kumar) आहे.
सरकारी नोकरी करणाऱ्यांना सुंदर पत्नी भेटते, असे म्हटले जाते. पण अॅटलीच्या पत्नीचा फोटो पाहिल्यानंतर तुमचा हा समज नष्ट होईल. अॅटलीच्या पत्नीचं नाव प्रिया मोहन (Priya Mohan) आहे. प्रिया दिसायला खूपच सुंदर आहे. त्यामुळे अॅटलीने प्रियाला कसं पटवलं हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
बॉक्स ऑफिसवर सुपरहिट सिनेमे देणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये अॅटली कुमारची (Atlee Kumar) गणना होते. अॅटलीने 19 व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. 10 वर्षात त्याचे चार सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. 'जवान'साठी शाहरुखसुद्धा नकार देऊ शकला नाही असा हा दिग्दर्शक आहे. सध्या तो 'जवान' सिनेमा आणि पत्नीसोबतच्या फोटोमुळे चर्चेत आहे. सरकारी नोकरी असणाऱ्यांनाच सुंदर पत्नी भेटते असा उपरोधिक टोला नेटकऱ्यांकडून वर्तवला जात आहे. एटलीने दाक्षिणात्य सिनेमे गाजवले आहेच पण बॉलिवूडमध्येही त्याच्या नावाचा डंका आहे.
मनोरंजनसृष्टीत अॅटलीला बोलबाला (Atlee Kumar Movies)
दाक्षिणात्य सुपरस्टार अॅटलीने दिग्दर्शित केलेल्या पाचही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची गल्ला जमवला आहे. अॅटलीचा 2013 मध्ये 'रॉकी-रानी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने 65 कोटींची कमाई केली. त्यानंतर 2016 मध्ये त्याचा 'थेरी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने 105 कोटींची कमाई केली. 2017 मध्ये त्याचा 'मर्सल' सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने 135 कोटींची कमाई केली. त्यानंतर 2019 मध्ये 'बिगिल' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने 171 कोटींची कमाई केली. त्यानंतर आता 'जवान' हा सिनेमा प्रदर्शित झाला असून या सिनेमाने कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे.
शाहरुख खान स्टारर 'जवान' सिनेमा अजून किती कोटींचा गल्ला जमवणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. अॅटलीच्या निमित्ताने बॉलीवुडमधील जवान सिनेमाला साऊथ सिनेमातील ऍक्शन सीनचा टच मिळाला आहे. बॉलीवूडच्या किंग खान सोबत काम केलेल्या एटलीने भविष्यात दबंग खान अर्थात सलमान खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या