Jawan: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) जवान (Jawan) चित्रपट हा सध्या देशातीलच नाही तर परदेशातील बॉक्स ऑफिसवर देखील धुमाकूळ घालत आहे. सध्या शाहरुखच्या जवान या चित्रपटाबाबत एका तरुणीनं शेअर केलेल्या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान चित्रपटाचा शो सुरु असताना थिएटरमध्ये घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ सहार रशीद या मेकअप आर्टिस्टने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.  


सहार रशीद व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे की,'जवान चित्रपटाचा शो सुरु असताना चित्रपटाचा दुसरा भाग आधीच दाखवण्यात आला. त्यानंतर चित्रपट संपला. आम्हाला थिएटरच्या स्क्रिनवर इंटरव्हल असं लिहिलेलं दिसलं. आम्ही हा विचार केला की व्हिलन मेला मग इंटरव्हल कसा काय असेल? त्यानंतर आम्हाला लक्षात आलं की, त्यांनी चित्रपटाचा पहिला भाग दाखवलाच नाही. त्यांनी इंटरव्हलच्या नंतरचा भाग आधीच दाखवला. हे आमच्यासोबत आयुष्यात पहिल्यांदाच झालंय.'  सहार रशीदनं व्हिडीओमध्ये सांगितलं की, 'चित्रपट पाहण्यास आलेले लोक पैसे परत देण्याची मागणी करत आहेत.'


सहार रशीदनं या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'मी अनेक वर्षांनंतर शाहरुखचा चित्रपट पाहण्यासाठी गेले असताना काय घडले? हे पाहण्यासाठी कृपया संपूर्ण व्हिडिओ पाहा!'


पाहा व्हिडीओ:



सहार रशीद शेअर केलेल्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली,   'क्लायमॅक्स कळाला असेल, रहस्य कळालं असेल, पण तुम्हाला चित्रपटाचा विषय समजला नसेल.' 


जवान चित्रपटाचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. या चित्रपटामधील डायलॉग्स, गाणी आणि चित्रपटामधील अॅक्शन सीन्स या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. 


'जवान' या चित्रपटात शाहरुखसोबतच विजय सेतुपती, नयनतारा, दीपिका पादुकोण, संजय दत्त, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, रिद्धी डोगरा, गिरिजा ओक या कलाकारांनी  काम केलं आहे. जवान चित्रपटाचं दिग्दर्शन अॅटलीनं केलं आहे. जवान चित्रपटामधील 'जिंदा बंदा', 'चलेया' आणि 'नॉट रमैया वस्तावैया' ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या गाण्यांना नेटकऱ्यांची पसंती मिळाली.


इतर महत्वाच्या बातम्या:


'जबरा फॅन'! 'जवान' फिल्मची क्रेझ, शाहरुखच्या चाहत्याने चक्क 'थिएटरमधून काम' केलं, Work From Theater चा फोटो व्हायरल