Shah Rukh Khan :  बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या (Shah Rukh Khan) स्टाइलवर त्याचे चाहते भाळतात. शाहरुखच्या हेअर स्टाइलपासून त्याच्या फॅशनला अनेकजण फॉलो करतात. मात्र, शाहरुख खानला एका क्रिकेटपटूची हेअरस्टाइल आवडली आहे. त्याने मला देखील अशीच हेअरस्टाइल करायची आहे, असे म्हटले. आयपीएलच्या मैदानावरील  हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


रविवारी, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने 8 विकेट्स राखून विजय मिळवला. आता याच सामन्यानंतर एक व्हिडिओ समोर आला आहे.  या व्हिडीओनुसार, अभिनेता आणि कोलकाता संघाचा मालक असलेला शाहरुख खान हा क्रिकेटपटू सुयश शर्मासोबत बोलताना दिसत आहे. शाहरुखला सुयशची हेअरस्टाईल आवडली. त्यानंतर त्याने त्याची मॅनेजर पूजा ददलानीला बोलावले आणि मला देखील अशीच हेअरस्टाइल हवीय असे म्हटले. 


मैदानावर काय घडलं?


शाहरुख खानने मैदानावर सुयशला मिठी मारली आणि कोणाच्या सल्ल्याने ही हेअरस्टाईल केली आहे, असे विचारले. सुयशने सांगितले की हे आपोआप घडले. त्यानंतर बॉलीवूडच्या किंग खानने हसत हसत त्याची मॅनेजर पूजा ददलानीला मला देखील अशीच हेअरकट हवीय असे सांगितले.


शाहरुख खान हा कोलकाताच्या क्रिकेटपटूंसोबत थट्टा मस्करी करत असतो. याआधी शाहरुख हा रिंकू सिंग, श्रेयस अय्यर अशा खेळांडूसोबतही गप्पा मारताना दिसला होता. 






कोण आहे सुयश शर्मा?


सुयश शर्मा हा एक लेगस्पिन गोलंदाज आहे, जो डोक्यावर बँड बांधून खेळतो. त्याचे केस पूर्वी लांब असायचे, परंतु सध्याच्या सीझनमध्ये त्याने हँडसम लूक कॅरी केला आहे.  शाहरुख खानलाही या हँडसम लूकची भुरळ पडली आहे.  सुयशला आयपीएल 2024 मध्ये फक्त एकच सामना खेळता आला आहे. त्याने फक्त 2 षटके गोलंदाजी केली आहे. यंदाच्या सीझनमध्ये आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांपैकी 4 सामने कोलकाताने जिंकले आहेत. कोलकाता संघ सध्या 8 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.