Sunny Deol Missing Posters in Pathankot : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) मोठा चाहतावर्ग आहे. सनी त्याच्या अभिनयामुळे चर्चेत असतो. पण सध्या तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत असतो. पंजाबमधील पठाणकोटमध्ये सनी देओल  हरवला असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहेत. तर सनीला शोधणाऱ्याला 50 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. याआधीदेखील सनी हरवला असल्याचे पोस्टर पठानकोटमध्ये लावण्यात आले आहेत. 


सनी देओल लोकसभा निवडणुकीत गुरदासपूर-पठाणकोट मतदारसंघातून निवडून आले. मात्र, निवडून आल्यानंतर एकदाही ते मतदारसंघात दिसले नाहीत. त्यामुळे मतदारसंघातील लोक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. ते बेपत्ता असल्याचे पोस्टर पठाणकोटमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. पठाणकोटमध्ये सनीने काहीही विकास केला नसल्याचं नागरिकांचं मत आहे.


सरना बसस्थानकावर लावले सनी बेपत्ता असल्याचे पोस्टर


पठाणकोट जिल्ह्यातील हलका भोआ येथील सरना बस स्थानकावर सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहे. याआधीदेखील सनी देओल बेपत्ता झाल्याचे पोस्टर पठाणकोट आणि सुजानपूरमध्ये लावण्यात आले आहेत. संसदेत गेल्यानंतर सनी पठाणकोटमध्ये फिरकला नसून तेथील समस्या सोडवल्या नाहीत असं नागरिकांचं मत आहे. त्यामुळे आता पुन्हा पोस्टर लावत लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बसने प्रवास करणाऱ्या लोकांनाही सनीने पोस्टर वाटले आहेत. 


एकही समस्या न सोडवल्याचा सनीवर आरोप


संसदेत गेल्यानंतर सनी देओल पुन्हा आपल्या लोकसभेकडे परतला नाही असा आरोप सनीवर करण्यात आला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सनीला कोणीही तिकीट देऊ नये असा प्रचार पठाणकोटमध्ये करण्यात येत आहे. लोकांना फसवून सनी जिंकला असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. 


सनी देओलबद्दल जाणून घ्या... (Who is Sunny Deol)


सनी देओल हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता असण्यासोबत लोकसभेचे सदस्यदेखील आहेत. सनीने आजवर अनेक सिनेमांत आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. बेताब या सिनेमाच्या माध्यमातून सनीने 1983 मध्ये हिंदी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. सनीचे बॉर्डर आणि गदर हे सिनेमे सुपरहिट ठरले होते. गेल्या 25 वर्षांत सनीने वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. त्याचे घायल, बॉर्डर, गदर, इंडियन हे चित्रपट त्‍या-त्‍या काळातील प्रेक्षकांना वेड लावून गेले. अॅक्‍शन हिरो इमेजमध्‍ये अडकून पडलेल्‍या सनीने नंतरच्‍या काळात कॉमेडीपटातूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 


संबंधित बातम्या


Sunny Deol: मुंबईच्या रस्त्यावर नशेत फिरत होता सनी देओल? तारा सिंहनं स्वत:च सांगितलं व्हायरल व्हिडीओ मागील सत्य