मुंबई मिररने याबाबतचं वृत्त सुरुवातीला प्रकाशित केलं होते. त्यांनी सूत्रांच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, सिनेमामधील मुख्य अभिनेता प्रभास आणि खलनायक राणा दग्गुबाजी यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी एक व्यक्ती मध्यस्थी करतो, असा एक सीन आहे. यासाठी दिग्दर्शकांनी साऊथ अभिनेत्यांमध्ये सूर्या आणि मोहनलाल यांच्याशी संपर्क साधला होता. पण आता हाच भाग शाहरुख खानकडून करुन घेण्यात येत आहे.
पण यानंतर सिनेमाच्या निर्मात्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन ट्वीट करुन या संदर्भातील वृत्त फेटाळून लावलं आहे. निर्मात्यांनी आपल्या ट्वीटमध्ये,'' आम्हाला या सिनेमात शाहरुखला घेण्यात आनंदच झाला असता, पण दुर्दैवानं असं काही नाही. ती केवळ अफवा आहे.'' असं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, बाहुबली हा सिनेमा तीन भाषेत डब होणार असून, येत्या 10 जुलै रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.