शाहरुख अमेरिकेतील एअरपोर्टवर ताब्यात, किंग खान संतप्त
एबीपी माझा वेब टीम | 12 Aug 2016 03:08 AM (IST)
नवी दिल्लीः अभिनेता शाहरूख खानला अमेरिकेतील लॉस एंजेलिस विमानतळावर पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात आलं. चौकशी करुन शाहरुखला सोडण्यात आलं. त्याने ट्वीट करून या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेतील इमिग्रेशन विभागाने शाहरूखला विमानतळावर रोखून ठेवलं. मात्र याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. सुरक्षा व्यवस्थेचा आदर आहे, पण प्रत्येक वेळी असे प्रकार होणं चांगलं नसल्याचं शाहरुखने म्हटलं आहे. https://twitter.com/iamsrk/status/763894690093473793 शाहरूखसोबत 2012 मध्येही न्यूयॉर्क एअरपोर्टवर असाच घडला होता. यानंतर अमेरिकेने या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. शाहरुखला 2009 मध्येही न्यू जर्सी येथे अडवण्यात आलं होतं. दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या 'स्पॉटेड' या चित्रपटाच्या शुटिंगसाठी जात होता.