मुंबईः खिलाडी अक्षय कुमारच्या 'रुस्तम' सिनेमाला आता केवळ काही तासच बाकी आहेत. 'रुस्तम'च्या प्रमोशनसाठी बॉलिवूडची फौजच एकत्र आली आहे. त्यातच अभिनेत्री आलीया भट्टनेही 'रुस्तम'चं खास स्टाईलमध्ये प्रमोशन केलं आहे.   अक्षय कुमारच्या 'टिप टिप बरसा पाणी..' गाण्यावर डान्स करत आलियाने चाहत्यांना 'रुस्तम' पाहण्याचं सुचवलं आहे. 'वेडेपणासोबत येतो तो उत्साहीपणा' या कॅप्शनसह आलीयाने ट्विटरवर या डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे.   पाहा व्हिडिओः https://twitter.com/aliaa08/status/763624889047801856   अक्षय कुमारचा रुस्तम सिनेमा उद्या बॉक्स ऑफिसवर रिलीज होत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी यापूर्वीही बॉलिवूडचे दिग्गज कलाकार मैदानात उतरले होते. आलियानेही आता आपली एक्साईटमेंट दाखवत सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे.