बिग बॉस 10 चा दुसरा प्रोमो रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 04 Sep 2016 07:54 AM (IST)
नवी दिल्लीः अभिनेता सलमान खान सध्या बिग बॉस 10 च्या तयारीला लागला आहे. या सीजनचा दुसरा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये सलमान पहिलवानाच्या भूमिकेत दिसत आहे. तर पहिल्या प्रोमोमध्ये सलमानने अंतराळयानातून एंट्री घेतली आहे. बिग बॉस 10 या सीजनची 'सामान्य माणसांचा शो' अशी टॅग लाईन आहे. सलमानच्या या लूकने बिग बॉस 10 बदद्लची उत्सुकता आणखी वाढवली आहे. बिग बॉस 10 च्या दुसऱ्या प्रोमोमध्ये ग्रामीण भागातील प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पहिल्या प्रोमोतून सलमानने इतिहास घडणार असल्याचा दावा केला आहे. कारण पहिल्यांदा सामान्य प्रेक्षक बिग बॉसच्या सेटवर दिसणार आहे. सलमानने हा दावा केला असला तरी शोमध्ये काय होणार, याबद्दल संस्पेंस ठेवण्यात आला आहे. पाहा व्हिडिओः