नवी दिल्लीः सिनेनिर्माता करण जोहरच्या चौकशीची मागणी करणाऱ्या अभिनेता अजय देवगनच्या मागणीचं प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांनी समर्थन केलं आहे. अजयच्या 'शिवाय' सिनेमाविषयी वाईट रिव्ह्यू लिहिण्यासाठी करण जोहरने कमाल आर. खानला 25 लाख रुपये दिल्याचा आरोप अजयने केला आहे.

संबंधित बातमीः 'ऐ दिल..' विरोधात रिव्ह्यू, अजयची 25 लाखांची ऑफर : केआरके


अजय देवगनने काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एक ऑडियो क्लिप शेअर केली होती. कमाल आर. खान करण जोहरच्या सिनेमाविषयी चांगलं का बोलत आहे, त्याचं रहस्य या क्लिपमध्ये आहे. करण जोहरचा आगामी सिनेमा 'ऐ दिल है मुश्किल'चा चांगला रिव्हू देण्यासाठी कमाल खानला 25 लाख रुपये दिल्याचा आरोप अजयने केला आहे.

 

राजनिती, सत्याग्रह आणि गंगाजल अशा सुपरहिट सिनेमांमध्ये अजय आणि प्रकाश झा यांनी काम केलं आहे. ऑडियो क्लिप ऐकून आश्चर्य वाटलं नाही, कारण ते लोक घाबरलेले आहेत. स्वतःला वाचवण्यासाठी हेराफेरी करत आहेत, असं प्रकाश जा यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/prakashjha27/status/771938019259580416

कमाल खानची सोशल मीडियावरील वाचाळवीर अशी ख्याती आहे. अजयने ऑडियो क्लिप शेअर केल्यानंतर कमाल खानने सर्व आरोप फेटाळून लावले होते.