अमिताभ-आमीर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार!
एबीपी माझा वेब टीम | 04 Sep 2016 04:52 AM (IST)
मुंबई : बॉलिवूडचे महानायक आणि मिस्टर परफेक्शनिस्ट पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. अमिताभ बच्चन आणि आमीर खान लवकरच यशराज फिल्म्सच्या आगामी 'ठग' या सिनेमात झळकणार आहेत. आमीर आणि बिग बी एकत्र झळकणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. आता स्वत: अमिताभ यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे. एका वेबसाईटलला दिलेल्या मुलाखतीत बिग बींनी यशराज फिल्म्सच्या 'ठग' या सिनेमात आमीरसोबत काम करत असल्याचं सांगितलं. सध्या या सिनेमाबदद्ल जास्त काही बोलू शकत नाही. पण आमीरसोबत काम करण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचं अमिताभ बच्चन म्हणाले. अमिताभ बच्चन यांनी याआधी आमीर खानच्या 'लगान' चित्रपटात आवाज दिला होता. 'धूम 3' चा दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य 'ठग'चं दिग्दर्शन करणार आहे. सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट असेल. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल.