सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर बॉलिवूडचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनेही ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
"ऐतिहासिक निकाल!! आज खूप अभिमान वाटतोय! समलैंगिकतेला गुन्हेगारीच्या कक्षेबाहेर करणं आणि कलम 377 रद्द करणं ही मानवता आणि समान हक्कांसाठी मोठी बाब आहे. देशाने पुन्हा ऑक्सिजन मिळवला", असं ट्विट करण जोहरने केलं आहे.
कोर्ट काय म्हणाले?
प्रत्येकाला आपल्या मर्जीने जगण्याचा अधिकार आहे. जुनी विचारधारा बदलण्याची गरज, प्रत्येकाला स्वत:ची स्वतंत्र ओळख आहे. त्यामुळे समलिंगी संबंध हा गुन्हा नाही, असं सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने एकमताने निर्णय दिला.
समलिंगी संबंध गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 बाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. समलैंगिक संबंध गुन्हा नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला.
प्रत्येकाला आपल्या मर्जीने जगण्याचा अधिकार आहे. जुनी विचारधारा बदलण्याची गरज, प्रत्येकाला स्वत:ची स्वतंत्र ओळख आहे. लोकांना आपली मानसिकता बदलायला हवी. समलिंगी संबंध हा गुन्हा नाही, असं सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने एकमताने निर्णय दिला. LGBT( lesbian, gay, bisexual, transgender) या संपूर्ण कम्युनिटीसाठी हा महत्त्वाचा दिवस आहे.
समलिंगी संबंध गुन्हा नाही, पण कलम 377 ही कायम
सुप्रीम कोर्टाने कलम 377 रद्द केलेलं नाही, तर त्यातून परस्पर सहमतीने समलिंगी संबंधाला गुन्हेगारी कक्षेतून वगळलं.
कलम 377 अंतर्गत सहमतीने प्रौढांसोबत समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा नाही. मात्र सहमतीशिवाय समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा असेल. तसंच मुलं आणि जनावरांशी अनैसर्गिक संबंध गुन्ह्याच्या कक्षेत असेल, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या
समलिंगी संबंध गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
कलम 377 समलिंगी संबंध : सुप्रीम कोर्टात काय काय झालं?
समलैंगिक संबंध गुन्हा आहे की नाही? सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु
ब्रेकफास्ट न्यूज : काय आहेत समलैंगिकांच्या समस्या? टिनेश चोपडे यांच्याशी बातचीत
कलम 377 : अंतिम फैसला पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे
समलिंगी कायद्याचा सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार करावा : जेटली