लॉस एंजेलिस: अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनस यांचा साखरपुडा नुकताच मुंबईत पार पडला. गेल्या महिन्यात 18 तारखेला मुंबईत प्रियांका-निकची एन्गेजमेंट पार्टी झाली.
प्रियांका आणि निक जोनस हे गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. मात्र निकची यापूर्वी अनेक अफेयर्स होती. निकने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. त्यापैकीच एका एक्स गर्लफ्रेंडने पहिल्यांदाच निकच्या साखरपुड्याबाबत मौन सोडलं आहे.
निकची एक्स-गर्लफ्रेंड ओलिविया कल्पोने प्रियांका-निकच्या एन्गेजमेंटनंतर आनंद व्यक्त केला आहे. ओलिविया कल्पो ही 2012 मध्ये मिस युनिव्हर्स होती. तिने एक्स बॉयफ्रेण्ड निकला शुभेच्छा दिल्या, असं पीपल डॉट कॉमने म्हटलं आहे.
प्रियांका-निकच्या साखरपुड्याचे फोटो
कल्पो म्हणाली, “मला वाटतं कोणत्याही वेळी, कोणीही आपलं प्रेम मिळवू शकतं. निक-प्रियांकाच्या एन्गेंजमेंटने मी आनंदी आहे. प्रत्येकाला प्रेम आणि आनंद मिळावा”
निक आणि कल्पो यांचं 2015 मध्ये ब्रेकअप झालं होतं. कल्पो सध्या डॅनी अमेंडोलाला डेट करत आहे. डॅनी अमेंडोला हा मियामी डॉल्फिन फुटबॉल क्लबकडून खेळतो.
दहा वर्ष लहान
25 वर्षांचा निक जोनस अमेरिकन गायक, गीतकार आणि अभिनेता आहे. वयाच्या सातव्या वर्षी त्याने नाटकात काम करायला सुरुवात केली. प्रियांका चोप्रा निकपेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे.
प्रियंकाने भूमिका केलेल्या 'काँटिको' मालिकेतील तिचा सहकलाकार ग्रॅहम रॉजर्सने दोघांची ओळख करुन दिली होती. खुद्द निकनेच ही माहिती एका मुलाखतीत दिली होती. 'न्यू यॉर्कमध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो. 'मेट गाला विथ राल्फ लॉरेन' कार्यक्रमाला योगायोगाने आम्ही जाणार होतो. तेव्हा आम्ही एकत्र खूप छान वेळ घालवला. ती खूप प्रेमळ आहे. भारतात जाण्यासाठी मला धीर धरवत नाही' असं निक न्यूयॉर्कमध्ये म्हणाला होता.
संबंधित बातम्या
प्रियंका चोप्रा आणि निक हवाई बेटांवर लग्न करणार?
निकने प्रियंकाला दिलेल्या अंगठीची किंमत...
प्रियांका-निकच्या साखरपुड्याचे फोटो
प्रियांका आणि निकचा साखरपुडा, जेडब्लू मॅरियट हॉटेलमध्ये पाहुण्यांची रेलचेल
10 वर्ष लहान बॉयफ्रेण्डच्या हातात हात घालून प्रियांका लंडनला रवाना