मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर दुसऱ्यांदा बाबा बनला आहे. शाहिदची पत्नी मीराने खारच्या हिंदुजा रुग्णालयात मुलाला जन्म दिला आहे. काल संध्याकाळी मीराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
आपल्या घरातील छोट्या पाहुण्याच्या स्वागतासाठी शाहिद कपूर आणि इतर कुटुंबीय रुग्णालयात उपस्थित होते. बाळाच्या जन्माची बातमी कपूर कुटुंबीयांकडून अद्याप देण्यात आलेली नाही.
मीरा दुसऱ्यांदा आई बनली असून, शाहिद-मीरा यांना याआधीच मीशा नावाची मुलगी आहे. 26 ऑगस्ट 2016 रोजी मीराने मीशाला जन्म दिला होता. 7 जुलै 2015 मध्ये 34 वर्षीय शाहिद कपूर आणि 21 वर्षीय मीरा राजपूतचा विवाह झाला होता.
मीशाच्या जन्मावेळी शाहिदने स्वत: ट्वीट करत आपण बाबा झाल्याची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली होती. खुद्द शाहिदनेच मीरा प्रेग्नंट असल्याची माहिती दिली होती. शाहिदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अतिशय क्यूट फोटो पोस्ट करुन आपल्या घरी लवकरच दुसरा छोटा पाहुणा येणार असल्याची गुडन्यूज शेअर केली होती.
संबंधित बातम्या
मीराची प्रसुती करणारा डॉक्टर बेपत्ता, शाहिदकडून मदतीचं आवाहन
मीशानंतर शाहिद-मीराचं दुसऱ्या बाळासाठी प्लॅनिंग!