Scam 2003 Trailer: स्कॅम 2003 (Scam 2003) ही नवी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजमध्ये 2003 मधील तेलगी प्रकरण दाखण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी या वेब सीरिजचा टीझर रिलीज झाला होता. आता नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा ट्रेलर युट्यूबवर ट्रेंड देखील होत आहे. स्कॅम 2003 या वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये काही मराठी कलाकारांची झलक देखील दिसत आहे. जाणून घेऊयात त्या कलाकारांबद्दल...
स्कॅम 2003 या हिंदी वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये शशांक केतकर (Shashank Ketkar), समीर धर्माधिकारी (Sameer Dharmadhikari) आणि भरत जाधव (Bharat Jadhav) या कलाकारांची झलक पहायला मिळत आहे. तसेच भावना बलसावर यांनी देखील या वेब सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे.
शशांक केतकरनं स्कॅम 2003 या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यानं स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो खूप आनंदी दिसत आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, 'पहिला ट्रेलर पाहिल्यानंतर माझी प्रतिक्रिया!'
गगन देव रियार (Gagan Dev Riar) हे स्कॅम 2003 या वेब सीरिजमध्ये अब्दुल करीम तेलगीची भूमिका साकारत आहेत. या वेब सीरिजमधील गगन देव रियार यांचा अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
कधी रिलीज होणार 'स्कॅम 2003'?
'स्कॅम 2003' ही वेब सीरिज 1 सप्टेंबर 2023 रोजी सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.'स्कॅम 2003' चे दिग्दर्शक तुषार हिरानंदानी हा आहे. 'एक व्हिलन', 'फालतू' आणि 'टोटल धमाल' सारखे चित्रपट लिहिणाऱ्या तुषारने 'सांड की आँख' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. हंसल मेहता यांनी 'स्कॅम 1992' ही वेब सीरिज दिग्दर्शित केली होती, पण 'स्कॅम 2003' या वेब सीरिजचे ते शो रनर आहेत. 'स्कॅम 2003' या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संंबंधित बातम्या: