Maharashtra Budget 2023 : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2023-24 या वर्षाकरता अर्थसंकल्प (Budget) सादर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये मराठी भाषा आणि मनोरंजन क्षेत्रासाठी विविध घोषणा करण्यात आल्या. यामध्ये श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ , विश्वकोष कार्यालय वाई (सातारा), मराठी भाषा भवन, ऐरोली येथे इमारतींची कामे करण्याची घोषणा केली.
नाट्यगृहांच्या देखभालीसाठी देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
सांगली नाट्यगृहासाठी 25 कोटी, गोरेगाव आणि कोल्हापूर चित्रनगरीसाठी 115 कोटी, विदर्भ साहित्य संघाला 10 कोटी रुपयांची घोषणा केली. तसेच सर्व नाट्यगृहांच्या देखभालीसाठी 50 कोटींची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली.
राज्यसरकार हे गेल्या काही दिवसांपासून मनोरंजनक्षेत्राकडे विशेष लक्ष देताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी मराठी चित्रपटांना अनुदान दिले होते. त्यांनी 41 मराठी चित्रपटांना आज 12 कोटी 71 लाखांचे अनुदानाचं वाटप केलं होतं. आता देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मनोरंजनक्षेत्राबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या बजेटमधील इतर मोठ्या घोषणा
- केंद्राप्रमाणे शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी, शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये भरणार
- - महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा
- - धनगर समाजाला 1000 कोटी रुपये, महामंडळामार्फत 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध
- - छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये
- - 5000 गावांमध्ये सुरु करणार जलयुक्त शिवार 2.0
- विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ, पाचवी ते सातवच्या विद्यार्थ्यांना 1000 वरुन 5000 रुपये तर आठवी ते दहावीच्या 1500 वरुन 7500 रुपये, विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत
- शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजार रुपयांची वाढ
- विद्यापीठे/ शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपये अनुदान
- राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे
- नागपूर येथे 1000 एकरावर लॉजिस्टिक हब
- खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध, बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारणार
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अर्थसंकल्पीय भाषण
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: