Satish Kaushik Passes Away: अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या निधाननं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सतीश यांच्या पार्थिवावर आज मुंबईमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. सतीश यांच्या कुटुंबानं एक पत्रक जारी केलं आहे. या पत्राकामध्ये लिहिलं आहे की, सतीश यांच्या पार्थिवावर 5 वाजता अंधेरी (Andheri) येथील हिंदू स्माशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. 'सतीश आणि त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा' असंही या पत्रकामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. सतीश यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटी सतीश यांच्या वर्सोवा येथील घरी गेले आहेत.
दिल्लीमध्ये झाले शवविच्छेदन
एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, दिल्ली येथील दीनदयाळ रुग्णालयात सतीश कौशिक यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन करण्यात आलं. सतीश यांचे आज (गुरुवारी) पहाटे निधन झाले. त्यांचे पार्थिव दीनदयाळ रुग्णालयात आणण्यात आले. दीनदयाळ रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन 11 वाजता करण्यात आलं.
सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. आता त्यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. एबीपी न्यूजला अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट शेअर करुन सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली.
सतीश कौशिक यांनी 'या' चित्रपटांमध्ये केलं काम
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सतीश यांनी नाटकांमध्ये काम केलं. तसेच दीवाना मस्ताना, राम लखन आणि साजन चले ससुराल या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. सतीश कौशिक यांनी 1983 मध्ये रिलीज झालेल्या जाने भी दो यारो या चित्रपटात अशोक ही भूमिका साकारली. तसेच 1983 मध्येच रिलीज झालेल्या वो 7 दिन, मासूम, मंडी या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं. 1987 मध्ये रिलीज झालेल्या मिस्टर इंडिया या चित्रपटामधील त्यांनी साकारलेल्या कॅलेंडर या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
सतीश यांनी चित्रपटांबरोबरच मालिकांमध्ये देखील काम केले. त्यांनी कथा सागर, मे आय कम इन मॅडम या मालिकांमध्ये काम केलं. तसेच त्यांनी स्कॅम 1992 या सीरिजमध्ये देखील काम केलं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: