Satish Kaushik Birthday Celebration : दिवंगत अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या जयंतीनिमित्त बॉलिवूडमधील त्यांच्या खास मित्रांनी मुंबईत एका पार्टीचं आयोजन केलं होतं. पार्टीदरम्यान बॉलिवूडकरांनी सतीश कौशिक यांच्या आठवणींना उजाळा दिला.
सतीश कौशिक यांचा जिवलग मित्र अनुपम खेर (Anupam Kher) यांनी या पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत जावेद अख्तर, अनिल कपूर, रानी मुखर्जी, नीना गुप्ता, जॉनी लीवर, उदित नारायण, अरमान मलिक, सुभाष घई, शंकर महादेवन, विवेक अग्निहोत्री, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, सोनाली बेंद्रे, अनूप सोनी राकेश बेदी सारखे अनेक कलाकार उपस्थित होते.
सतीश कौशिक यांच्या आठवणीत सिनेसृष्टीतील मंडळी भावूक
सतीश कौशिक यांच्या आठवणींना उजाळा देताना सिनेसृष्टीतील मंडळी भावूक झाले होते. अनेकांनी सतीश कौशिक यांचे किस्से शेअर केले. दरम्यान गीतकार, लेखक जावेद अख्तर सतीश कौशिक आणि अनुपम खेर यांच्या मैत्रीबद्दल भाष्य करत म्हणाले,"माझ्या निधनानंतर माझे मित्रदेखील माझा वाढदिवस अशाचप्रकारे साजरा करणार असतील तर मला नक्कीच आवडेल. सतीश हरणारा व्यक्ती नाही".
सतीश कौशिक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत (Satish Kaushik Birthday Celebration Party) संगीत, नृत्य अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अनिल कपूरने 'मिस्टर इंडिया' या सिनेमातील 'हवा हवाई' या गाण्यावर डान्स केला. दुसरीकडे जॉनी लीवरने आपल्या विनोदाने सर्वांना हसवलं.
आठवणींना उजाळा देताना अनिल कपूर म्हणाले...
अनिल कपूर म्हणाले,"माझ्या करिअरच्या सुरुवातील मला सतीश कौशिक आणि जॅकी श्रॉफ यांच्याबद्दल खूप कुतूहल वाटायचं. त्यावेळी सिनेविश्वातील मुली सतीश कौशिक यांच्यासोबतच खूप चांगल्याप्रकरे संवाद साधत असे. सतीश कौशिकची सदसद विवेक बुद्धि खूपच चांगली होती. त्याची ही गोष्टी मुलींना आवडायची मात्र मला खटकायची".
आठवणींना उजाळा देत सुभाष घई सतीश कौशिक यांनी भारताचा चार्ली चॅप्लिन असं म्हणाले. गायक उदिल नारायणने 'तेरे नाम' सिनेमातील गाणं गात तर अरमान मलिकने 'मैं रहूं या ना रहूं' हे गाणं गात सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली. पार्टीदरम्यान सतीश कौशिक यांची पत्नी आणि लेकीच्या उपस्थितीत एक केक कट करण्यात आला.
संबंधित बातम्या