Sara Ali Khan: अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे सध्या त्यांच्या 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. प्रमोशनसाठी ते केवळ शहरात फिरत आहेत. काही दिवसांपूर्वी सारा आणि विकी हे लखनौ येथील शिव मंदिरात गेले होते. यावेळी सारा आणि विकी यांनी शिव मंदिरात प्रार्थना केली. आता सारा ही मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिरात गेली. या मंदिरात तिनं महाकाल देवाचे दर्शन घेऊन प्रार्थना केली आहे. महाकाल मंदिरातील साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
महाकाल देवाच्या भस्म आरतीसाठी सारा अली खान ही बुधवारी सकाळी महाकाल मंदिरात आली होती.यावेळी सरानं मंदिराच्या नंदीहॉलमध्ये बसून जप केला. महाकाल मंदिरातील साराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
पाहा व्हिडीओ:
काही दिवसांपूर्वी सारा आणि विकी कौशल यांनी लखनौमधील शिव मंदिराला देखील भेट दिली. या शिव मंदिरातील फोटो सारानं सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये विकी आणि सारा हे प्रार्थना करताना दिसत आहेत. या फोटोला सारानं कॅप्शन दिलं, 'जय भोले नाथ' सारानं शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सारा आणि विकी यांच्या 'जरा हटके जरा बचके' हा विकी आणि साराचा चित्रपट 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विकी आणि सारासोबतच या चित्रपटात राकेश बेदी, शारीब हाश्मी, नीरज सूद हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Sara Ali Khan : सारा अली खान पोहोचली अजमेर शरीफ दर्ग्यात; सिनेमाच्या यशासाठी मागितली दुआ