Sara Ali Khan Zara Hatke Zara Bachke : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) या सिनेमामुळे चर्चेत आहे. तिचा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सारा सध्या 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाचं प्रमोशन करत असून आता या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान तिने राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली आहे.
सारा अली खानने नुकतीच राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली आहे. अजमेर शरीफ दर्ग्यातील साराच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्रीला भेटण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. साराला भेटण्यासाठी अजमेर शरीफ दर्ग्यात साराच्या चाहत्यांनी खूप गर्दी केली होती.
अजमेर शरीफ दर्ग्याला साराने भेट दिली त्यावेळी तिने फिकट हिरव्या रंगाचा सूट परिधान केला होता. तसेच डोक्यावर दुपट्टा घातला होता आणि सनग्लास लावला होता. व्हायरल व्हिडीओमध्ये सारा दर्ग्याच्या भिंतीला धागा बांधून दुआ मागताना दिसत आहे.
सारा अली खानला अजमेर शरीफ दर्ग्याच्या आवारात चाहत्यांनी घेरलं होतं. तिच्यासोबत बॉडीगार्डदेखील होते. तसेच एका फोटोमध्ये सारा अली खान तिच्या सिनेमाच्या यशासाठी दुआ मागताना दिसत आहे. सारा अनेकदा मंदिरे आणि दर्ग्यांना भेट देताना दिसते. 2021 मध्ये सारा तिच्या आईसोबत म्हणजेच अमृता सिंहसोबत अजमेर शरीफ दर्गाला गेली होती.
साराचा 'जरा हटके जरा बचके' 'या' दिवशी होणार रिलीज! (Sara Ali Khan Zara Hatke Zara Bachke Release Date)
सारा अली खानचा आगामी 'जरा हटके जरा बचके' हा सिनेमा 2 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना रोमान्स, नाट्य आणि विनोद पाहायला मिळणार आहे. या सिनेमात सारासह विकी कौशलदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसेच राकेश बेदी, शारिब हाशमी, नीरज सूदसह अनेक कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सारा आणि विकी सध्या या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत.
संबंधित बातम्या