मुंबई : अभिनेता संजय दत्तचा बायोपिक 'संजू'ने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी धुमाकूळ घालत 38.60 कोटींची कमाई केली. या सिनेमा पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 34.75 कोटींचा गल्ला जमवला होता. संजू या वर्षातला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा सिनेमा आहे.
बाहुबली 2 या बिग बजेट सिनेमानंतर संजू वीकेंडला एवढी मोठी ओपनिंग मिळवणारा एकमेव बॉलिवूड सिनेमा आहे. 'संजू'ने दोन दिवसात एकूण 73.35 कोटींची कमाई केली आहे. शिवाय आज रविवार असल्यामुळे आजही सिनेमा चांगली कमाई करणार आहे.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'संजू' चित्रपटात रणबीर कपूर, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, मनिषा कोईराला, परेश रावल, विकी कौशल, करिष्मा तन्ना, महेश मांजरेकर अशी कलाकारांची फौज आहे.
2018 वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये 'संजू'ने सलमान खानचा 'रेस 3', टायगर श्रॉफचा 'बागी 2' आणि दीपिका-रणवीरच्या 'पद्मावत' या चित्रपटांना मागे टाकलं.
संजय दत्तच्या बायोपिकचा मच अवेटेड टिझर रिलीज
सलमान खानच्या 'रेस-3' ने पहिल्या दिवशी 29.17 कोटी, 'बागी-2' ने 25.10 कोटी कमावले होते. चौथ्या क्रमांकावर 'पद्मावत' (19 कोटी) तर पाचव्या क्रमांकावर 'वीरे दी वेडिंग (10.70 कोटी) आहे.
नॉन हॉलिडे (बँक हॉलिडे नसलेल्या शुक्रवारी) प्रदर्शित होऊन सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही संजूने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. बॉलिवूडच्या इतिहासात 'संजू' हा नॉन हॉलिडेला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा दुसरा सिनेमा ठरला आहे. 'बाहुबली' (122 कोटी) हा या यादीतील अव्वल चित्रपट आहे.
रणवीर कपूरची मुख्य भूमिका असलेला हा सर्वाधिक ओपनिंग मिळालेला चित्रपट ठरला आहे. यापूर्वी रणवीरच्या चित्रपटांमध्ये 'बेशरम'ने पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई केली होती.
'संजू' चित्रपटाला समीक्षकांची पसंती मिळाली असून प्रेक्षकांच्याही चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. त्यामुळे पहिल्या वीकेंडला हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, 'संजू'ची एकूण कमाई...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jul 2018 12:22 PM (IST)
या सिनेमा पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 34.75 कोटींचा गल्ला जमवला होता. संजू या वर्षातला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा सिनेमा आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -