Sanjay Raut ON Nitin Desai And Sunny Deol : बॉलिवूड अभिनेता भाजप खासदार सनी देओल (Sunny Deol) जो न्याय लावला तो न्याय कला दिग्दर्शक नितीन देसाईंना (Nitin Desai) का नाही असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी क्रेंद्र सरकारला (Central Government) विचारला आहे. लिलाव पुकारल्यानंतर दिल्लीतून सूत्र हल्ली आणि सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव थांबवला. सनी देओल यांनी 60-70 कोटींचं कर्ज घेतलं होतं. हे कर्ज ते फेडू शकले नाहीत. त्यामुळे बँकेने लिलाव केला होता. मात्र दिल्लीतून सूत्र हल्ली त्यानंतर लिलाव थांबवण्यात आला. मग नितीन देसाईंसोबत अन्याय का असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.


"आमच्या नितीन देसाईंना वेगळा न्याय का" : संजय राऊत


सनी देओल (Sunnu Deol) भाजपचे (BJP) खासदार असल्यामुळे त्यांना वेगळा न्याय आणि नितीन देसाईंना हा न्याय का नाही? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले,"सनी देओल भाजपचे खासदार आहेत. त्यांनी 60-70 कोटी कर्ज घेतलं होतं. ते कर्ज ते फेडू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या बंगल्याचा लिलाव पुकारला. बँकेने त्यासंदर्भात नोटीस काढली, ऑक्शन पुकारलं. पण 24 तासात दिल्लीतून काही सूत्र हल्ली आणि लिलाव थांबावला गेला. सनी देओल आणि त्यांच्या बंगल्याला वाचवण्यात आलं मग हाच न्याय नितीन देसाई यांना का देण्यात आला नाही. सनी देओल भाजप खासदार, स्टार प्रचारक असल्यामुळे महाराष्ट्राच्या नितीन देसाईंना वेगळा न्याय का? नितीन देसाई दिल्लीमध्ये भाजपच्या नेत्यांना भेटले होते". 


नेमकं प्रकरण काय? 


बॉलिवूड अभिनेते सनी देओल हे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. त्यांनी बँकेचे 56 कोटींचे कर्ज थकवले होते. त्यामुळे मुंबईतील जुहू येथील त्यांचा बंगल्याचा लिलाव (Sunny Deol Bungalow) पुकारण्यात आला होता. पण त्यानंतर लगेचच चोवीस तासात बँकेने तांत्रिक कारण देत लिलाव रद्द केला. त्याआधी पंधरा दिवसांपूर्वी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना याच कारणाने आत्महत्या करावी लागली. 


नितीन देसाई यांच्या डोक्यावर बँकेचे कर्ज होते. त्यांच्या एनडी स्टुडिओवर जप्तीची कारवाई सुरू होती. याच धक्क्यातून बाहेर न आल्याने देसाई यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. आता सनी देओल हे भाजपचे खासदार असल्यामुळे त्यांना वेगळा न्याय दिला आणि नितीन देसाई यांना वेगळा न्याय दिला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे नितीन देसाई हे उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत मागायला गेले तेव्हा मराठी उद्योजक यांना उद्धव ठाकरे यांच्या दरवाजावरून हाकलून दिले, मदत दिली नाही याची यादी सुद्धा माझ्याकडे आहे, असं भाजप आमदार प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. 


संबंधित बातम्या


Sunny Deol Bungalow : सनी देओलच्या बंगल्यावरील लिलाव प्रक्रियेला अचानक स्थगिती, बँक ऑफ बडोदाकडून तांत्रिक कारणाची सबब