मुंबई : संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित 'संजू' सिनेमाने आठवडाभरात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. सिनेमाची सर्वांनी प्रशंसा केली आहे. आपल्या जीवनावर आधारित सिनेमा संजय दत्तला कसा वाटला? याची सर्वांना उत्सुकता असेल. सिनेमा पाहिल्यानंतर संजय दत्तची प्रतिक्रिया काय होती याची माहिती दिग्दर्शक राजकुमार हिरानीने दिली आहे.


संजय दत्तला सिनेमा खूप आवडला असल्याचं राजकुमार हिरानीने सांगितलं. 'संजय दत्तला आम्ही सिनेमा दाखवला, त्यावेळी त्याचे हावभाव पाहण्यासारखे होते. सिनेमा संपल्यानंतर संजय दत्त खुप रडत होता. रडता रडता संजय दत्तने शेजारी उभ्या असलेल्या रणबीर कपूरला मिठी मारली. संजय दत्तने रणबीरला बराच वेळ घट्ट मिठी मारली होती', असं राजकुमारी हिरानीने सांगितले.


'संजू' सिनेमा पाहून अनेकांना आपले अश्रू अनावर झाले. सिनेमात असे अनेक क्षण आहेत, ज्यावेळी प्रेक्षकांच्या डोळ्यातून नकळत अश्रू येतात. आमिर खानने सिनेमा पाहिल्यानंतर ट्विटरवर लिहिलं की, 'राजू आणखी एक मनोरंजन आणि सशक्त सिनेमा दिल्याबद्दल धन्यवाद.'


'संजू'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई
'संजू'ने बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली 2' या सिनेमाचा रेकॉर्ड मोडत रविवारी 46.71 कोटींची कमाई केली. एकाच दिवशी सर्वाधिक 46.50 कोटींची कमाई करण्याचा रेकॉर्ड बाहुबली 2 च्या नावावर होता. 'संजू'ने पहिल्या तीन दिवसात एकूण 120.6 कोटींची कमाई केली आहे. हिंदी सिनेमाच्या इतिहासात एका दिवसात एवढी कमाई करणारा संजू पहिलाच सिनेमा आहे.


संबधित बातम्या


'संजू'ने इतिहास रचला, रविवारी 'बाहुबली 2' चाही विक्रम मोडला


...जेव्हा सुटकेसाठी संजय दत्त बाळासाहेबांना शरण गेला होता!


 रिव्ह्यू- संजू : आयुष्यभराचा धडा