Sanjay Dutt to join Politics : लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election 2024) अनेक कलाकारांची वर्णी लागली असताना अनेक कलाकारांच्या राजकारणातील एन्ट्रीच्या देखील चर्चा रंगत आहेत. अभिनेता गोविंदा (Govinda) याने शिंदेंच्या शिवसेनेत (Shiv Sena Shinde Group) प्रवेश केल्यानंतर संजय दत्तच्या (Sanjay Dutt) देखील राजकारणातील प्रवेशाच्या चर्चा सुरु होत्या. तसेच संजय दत्त भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत होतं.  पण यावर आता अभिनेत्याने स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे संजूबाबा राजकारणात येणार की नाही ही बाब स्पष्ट झालीये. 


अभिनेता संजय दत्तने आपण राजकारणात येत नसल्याचे स्पष्ट केलं आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की तो लोकसभा निवडणूक लढवू शकतो. त्यामुळे संजूबाबा जर राजकारणात आला तर कोणत्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवणार याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे. दरम्यान संजय दत्तचे वडील आणि दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त देखील राजकारणात सक्रिय होते. त्याचप्रमाणे त्यांची मुलगी प्रिया दत्त ही देखील राजकारणात आहे. त्यामुळे संजय दत्तच्या राजकारणातील एन्ट्रीच्या चर्चांनी जोर धरला होता. 


संजय दत्तने काय म्हटलं?


संजय दत्तने ट्विट करत म्हटलं की, मला माझ्या राजकारणात येण्याच्या सर्व अफवांना पूर्णविराम द्यायचा आहे. मी कोणत्याही पक्षात सामील होत नाही किंवा निवडणूक लढवणार नाहीये. जर मी जर मी राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला, तर ते जाहीर करणारी मी एकमेव व्यक्ती असेन. त्यामुळे या कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका. 






संजय दत्तची बहिण प्रिया दत्तही राजकारणात सक्रिय आहे. त्याचप्रमाणे  काही दिवसांपूर्वी अभिनेता गोविंदाने शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे वायव्य मुंबईतील लोकसभा मतदारसंघातून गोविंदा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच त्याच मतदारसंघासाठी शिंदे गटाकडून सचिन खेडेकर, सचिन पिळगांवकर, शरद पोंक्षे यांच्या नावाची चाचपणी सुरु असल्याचं समोर आलं होतं.पण सचिन पिळगांवकर यांनी देखील या आरोपांचं खंडन केलं होतं. 


ही बातमी वाचा : 


Aishwarya Divorce : 18 वर्षांचं नातं तुटलं, ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेला सुरुवात; कोर्टात दाखल केला अर्ज