Sanjay Dutt : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्याने नुकताच 64 वा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसानिमित्त अभिनेत्याच्या आगामी 'लियो' (Leo) या सिनेमातील फर्स्ट लूक दिग्दर्शक लोकेश कनगराज (Lokesh Kanagraj) यांनी आऊट केला आहे. आता संजू बाबाच्या 'लियो' या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संजू बाबाच्या आगामी 'लियो' या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या लूकमध्ये ते प्रचंड आक्रमक दिसत आहेत. आता या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. फर्स्ट लूकने चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे. 'लियो' या सिनेमाचा दिग्दर्शक लोकेश कनगराजने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. 






लोकेश कनगराजने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"अंटनी दासला भेटा. आमच्याकडून संजय दत्त सरांना एक छोटीशी भेट. तुमच्यासोबत काम करताना खरचं खूप आनंद झाला आहे. संजय दत्तला वाढदिवसाच्या शुभेच्छा". फर्स्ट लूकमध्ये संजय दत्तचा बॉसी अंदाज पाहायला मिळाला आहे. या सिनेमात तो खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. 


संजय दत्तच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त 'लियो'चा टीझर आऊट करण्यात आला आहे. या सिनेमात अभिनेता 
गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय दत्तचा हा दुसरा दाक्षिणात्य सिनेमा आहे. याआधी तो 'केजीएफ चॅप्टर 2'मध्ये (KGF: Chapter 2) झळकला होता. 'लियो' सिनेमातील संजयचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 
वाढदिवसानिमित्त 'लियो'चा टीझर रिलीज केल्याबद्दल संजय दत्तने या सिनेमाच्या टीमचे आभार मानले आहेत. 


संजयचा 'लियो' कधी प्रदर्शित होणार? (Sanjay Dutt Leo Released Date)


'लियो' या सिनेमात संजय दत्तसह थलापती विजय, तृषा कृष्णन, अर्जुन सर्जा, मन्सूर अली खान, प्रिया आनंद हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 'लियो' हा सिनेमा 19 ऑक्टोबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात एकापेक्षा एक दाक्षिणात्य कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. थलापती विजय आणि संजय दत्त 'लियो' या सिनेमाच्या माध्यमातून 14 वर्षांनी रुपेरी पडद्यावर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. 


संबंधित बातम्या


Sanjay Dutt : संजय दत्तने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली मोठी भेट, साऊथच्या नवीन चित्रपटातील फर्स्ट लूक समोर