मुंबई : अभिनेता संजय दत्तची कन्या त्रिशालाने आपल्या बॉयफ्रेण्डला वियोगातून पत्र लिहिलं आहे. दोघांचा विरह झाला तो मृत्यूने! त्रिशालाने लिहिलेली इन्स्टाग्राम पोस्ट वाचून तिचे फॉलोअर्सही गदगदले आहेत.


आपल्या इटालियन बॉयफ्रेण्डसोबतचा फोटो शेअर करुन त्रिशालाने त्याला उद्देशून काही ओळी लिहिल्या आहेत. 'माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले आहेत. माझ्यावर प्रेम केल्याबद्दल, माझं रक्षण केल्याबद्दल आणि माझी काळजी घेतल्याबद्दल आभार. तू मला सर्वाधिक आनंदी ठेवलंस. तुझी भेट घडल्याने मी स्वतःला जगातली सर्वात भाग्यशाली मुलगी मानते. मी तुझी झाले, हे तर कल्पनेपल्याडचं. तू माझ्यामध्ये अनंत काळापर्यंत जिवंत राहशील. आय लव्ह यू अँड आय मिस यू. आपली पुन्हा भेट होईपर्यंत. सदैव तुझीच. तुझी बेला मिया' अशी भावनिक साद त्रिशालाने बॉयफ्रेण्डला घातली आहे.



त्रिशालाने आपल्या पोस्टमध्ये प्रियकराच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. त्याचा मृत्यू 2 जुलै रोजी झाल्याचं तिने म्हटलं आहे. मात्र त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण कुठेही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्रिशालाने यापूर्वीही त्याच्यासोबत रोमँटिक डेटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

त्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची दिवंगत (पहिली) पत्नी रिचा शर्मा यांची कन्या आहे. रिचा यांच्या मृत्यूनंतर संजय दत्तच्या वाट्याला जे दुःख आलं, तसाच वियोग त्रिशाच्या नशिबी आल्याचं म्हटलं जात आहे.