मुंबई : अभिनेता संजय दत्त याचा अरेस्ट वॉरंट रद्द करण्यात आला आहे. मुंबईतील अंधेरी कोर्टाने हा आदेश दिला. अटक वॉरंट रद्द करण्यासाठी स्वत: संजय दत्त अंधेरी कोर्टात हजर झाला होता.

निर्माता शकील मोरानी यांचा चित्रपट संजय दत्तने अर्ध्यावर सोडला होता. त्याविरोधात मोराणी यांनी कोर्टात धाव घेतली. वेळोवेळी आदेश देऊनही संजय दत्त सुनावणीला हजर झाला नव्हता. त्यामुळे अंधेरी कोर्टाने संजुबाबाला अटक वॉरंट बजावला होता. त्यानंतर आज संजय दत्त कोर्टात हजर झाल्यानंतर हा अटक वॉरंट रद्द करण्यात आला.

काय आहे नेमकं प्रकरण?

2002 साली दिग्दर्शक शकील नुरानी यांनी संजय दत्त विरोधात कोर्टात खटला दाखल केला होता.  शकील नुरानी हे ‘जान की बाजी’ हा सिनेमा तयार करत होते. या सिनेमात संजय दत्त लीड रोलमध्ये होता. या चित्रपटासाठी संजय दत्तला शकील नुरानींनी 50 लाख रुपये दिले होते. मात्र,  संजय दत्त दोनचं दिवस शुटींगसाठी आला. यामुळे आपलं पाच कोटीचं नुकसान झाल्याचा दावा नुरानींनी केला. याप्रकरणी दाद मागण्यासाठी नुरानी यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले. हायकोर्टाने पैसे परत करण्याचे संजय दत्तला आदेश दिले. त्यानंतर संजयनं जो चेक नुरानी यांना दिला तो बाउंस झाला.

चेक बाउंस झाल्यानं नुरानींनी पुन्हा एकदा कोर्टात धाव घेतली. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कोर्टानं दोन ते तीन वेळी संजय दत्तला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण कोर्टाच्या आदेशानंतरही तो हजर न राहिल्याने आज अंधेरी मेट्रोपॉलिटियन मेजेस्ट्रिट कोर्टानं त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं.

संबंधित बातमी : अभिनेता संजय दत्तविरोधात अटक वॉरंट जारी