हैदराबादः भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा हैदराबादमध्ये पार पडला. बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान यावेळी उपस्थित होता. 'एस अगेन्स्ट ऑड्स' हे सानियाचं आत्मचरित्र तिच्या आजवरच्या वाटचालीवर प्रकाश टाकतं.


 

 

सानियानं या पुस्तकात आपल्या भोवती निर्माण झालेल्या वादांवरही भाष्य केलं आहे. हैदराबादसह भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये हे आत्मचरित्र लवकरच चाहत्यांसाठी उपस्थित होणार आहे.

 



 

करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी कठीण मेहनती शिवाय पर्याय नसतो. यश-अपयश पचवण्याची प्रतेक्यामध्ये क्षमता असावी, असं शाहरुखने यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं देताना सांगितलं. आपल्या करिअरमधील काही उदाहरणं देखील शाहरुखने यावेळी शेअर केली.

 

 

'एस अगेन्स्ट ऑड्स' हे आत्मचरित्र सानियाच्या करिअरमधील वादांसह अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे. हे आत्मचरित्र आणण्याची कल्पना स्वतः सानियाची होती, असं सानियाचे वडिल इम्रान मिर्झा यांनी सांगितलं.