मुंबई : बॉलिवूडचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखची पत्नी, अभिनेत्री जेनेलिया डिसुझा-देशमुखने काहीच महिन्यांपूर्वी दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर जेनेलिया मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
अभिनय देवच्या आगामी 'फोर्स 2' चित्रपटात जेनेलिया कॅमिओ म्हणजेच पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. 'स्पॉटबॉय' वेबसाईटच्या माहितीनुसार चित्रपटातील एका महत्त्वाच्या सीनसाठी अभिनय जेनेलियासाठी आग्रही आहे. एखाद-दुसरा दिवस या सीनच्या शूटिंगसाठी पुरेसा आहे.
जेनेलियाने मात्र अद्याप यावर उत्तर कळवलं नसल्याचं म्हटलं जात आहे. नुकतंच बाळंतपण झाल्यामुळे जेनेलिया द्विधा मनस्थितीत असावी, असं सुत्रांनी म्हटलं आहे. फोर्स चित्रपटाच्या पहिल्या भागात जेनेलियाने जॉनची नायिका साकारली होती. मात्र क्लायमॅक्सला तिच्या व्यक्तिरेखेचा मृत्यू होतो. दुसऱ्या भागात मात्र तिचा स्पेशल रोल असावा, अशी देव यांची मागणी आहे.
2012 मध्ये रितेश आणि जेनेलियाने 'तेरे नाल लव्ह हो गया' हा चित्रपट केला होता. त्यानंतर जय हो आणि लय भारी चित्रपटात पाहुणी भूमिका केली होती. 25 नोव्हेंबर 2014 ला रिआन या पहिल्या मुलाचा आणि 1 जून 2016 ला त्यांचा दुसरा मुलगा राहिलचा जन्म झाला होता.