Sania Mirza Shares a Cryptic Post Amid Shoaib Malik Divorce News : भारतीय टेनिस खेळाडू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या घटस्फोटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. 2022 पासून सानिया आणि शोएब यांच्यात सारं काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आता टेनिस स्टारने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.


सानिया आणि शोएब यांचा घटस्फोट झाल्याची चर्चा आहे. अशातच टेनिस स्टारने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. सानियाच्या या क्रिप्टिक पोस्टनंतर नेटकरी मात्र हैराण झाले आहेत. या पोस्टनंतर सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाची दाट शक्यता वर्तवली जात आहे.


सानिया मिर्झाची क्रिप्टिक पोस्ट काय? (Sania Mirza Post)


टेनिस खेळाडू सानिया मिर्झाने नुकतीच एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. सानियाने लिहिलं आहे,"लग्न अवघड आहे, घटस्फोटही अवघड आहे. तुमचा मार्ग तुम्ही निवडा. वाढलेलं वजन ही अवघड बाब आहे. त्याप्रमाणे फिट राहणंदेखील गरजेचं आहे. कर्जबाजारी राहणं अयोग्य आहे. बोलणं कठीण आहे. अबोला ठेवणं कठीण आहे. आयुष्यात कोणतीच गोष्ट सोपी नाही. पण योग्य मार्ग निवडणं तुमच्या हातात आहे". 



सानिया मिर्झाचा खरंच घटस्फोट होणार? 


टेनिस खेळाडू सानिया मिर्झाच्या पोस्टनंतर तिच्या घटस्फोटाची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सानिया आणि शोएब यांनी त्यांच्या लेकाचा वाढदिवस एकत्र साजरा केला होता. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. पण आता पुन्हा एकदा या चर्चांना सुरुवात झाली आहे.


सानिया मिर्झाआधी शोएब मलिकने आयशा सिद्दीकीसोबत लग्न केलं होतं. आयशासोबत घटस्फोट झाल्यानंतर त्याने सानिया मिर्झासोबत दुसरं लग्न केलं. पण आता त्यांच्यातही दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे.


'या' कारणाने सानिया आणि शोएबचं बिनसलं?


शोएब मलिक पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमरसोबत रिलेशनमध्ये आहे. याच कारणाने सानिया आणि शोएबच्या नात्यात दुरावा आला आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक 2010 मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नाआधी पाच महिने त्यांनी एकमेकांना डेट केलं आहे. शोएब आणि सानियाच्या मुलाचं नाव इजहान आहे. शोएब मलिकने आतापर्यंत 25 कसोटी, 281 एकदिवसीय आणि 123 टी-20 सामन्यात पाकिस्तानाच्या संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. सानियाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने लिहिलं होतं,"एखादी गोष्ट जर संपुष्टात येणार असेल तर त्याचा विचार करू नये". सानियाच्या या पोस्टनंतर तिचं आयुष्य आलबेल नसल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.