Samir Choughule On Maharashtrachi Hasyajatra : विनोदवीर समीर चौघुले (Samir Choughule) गेल्या काही दिवसांपासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashrachi Hasyajatra) या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता समीरची 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' (Post Office Ughad Aahe) ही नवी मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे आता नेटकऱ्यांकडून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम बंद होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अखेर यासंदर्भात समीर चौघुलेने एबीपी माझाला माहिती दिली आहे.
समीर चौघुले म्हणाले,"महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही मालिका बंद होणार ही अफवा आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर 5 जानेवारीपासून गुरुवार, शुक्रवार, शनिवार 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही मालिका बंद होणार ही अफवा आहे. तसेच समीर चौघुलेने हास्यजत्रेला रामराम ठोकलेला नाही".
नेमकं प्रकरण काय?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही मालिका सोमवार ते बुधवार प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशातच आता 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेचा प्रोमो आऊट झाल्यापासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेचे चाहते नाराज झाले आहेत. 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' या मालिकेत समीर चौघुले, पृथ्वीक प्रताप, प्रभाकर मोरे, इशा डे आणि दत्तू मोरे या हास्यजत्रेतील कलाकारांचा समावेश आहे. त्यामुळे आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बंद होणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
अखेर समीर चौघुलेंनी ही मालिका बंद होणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना दोन्ही कार्यक्रम त्यांच्या लाडक्या कलाकारांसह पाहायला मिळणार आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम प्रेक्षक सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता पाहू शकतात. तर 5 जानेवारीपासून गुरुवार ते शनिवार 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' ही मालिका पाहू शकतात.
संबंधित बातम्या