...म्हणून अनुराग कश्यप सलमान खानवर भडकला!
एबीपी माझा वेब टीम | 22 Jun 2016 02:48 PM (IST)
मुंबई : सलमान खानच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आता बॉलिवूडमधूनच आवाज उठताना दिसतो आहे. सिनेनिर्माता अनुराग कश्यपने सलमानच्या वादग्रस्त विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. "सलमानचं वक्तव्य विचारशून्य आणि मुर्खपणाचं आहे." अशी टीका अनुराग कश्यपने सलमानवर केली. शिवाय, सलमानच्या मुलाखतीदरम्यान वादग्रस्त वक्तव्यानंतर हसणाऱ्या पत्रकारांवरही अनुरागने निशाणा साधला. सलमानचं वादग्रस्त वक्तव्य ‘सुलतान’ चित्रपटाच्या शूटिंगनंतर आपल्याला बलात्कार पीडितेसारखं वाटत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य सलमान खानने केलं आहे. ‘दररोज 120 किलो वजनाच्या माणसाला 10 वेगवेगळ्या अँगलमधून 10 वेळा उचलावं लागत होतं. दररोज सहा तास ही कसरत केल्यानंतर मला धड चालताही येत नव्हतं. कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर पडताना मला बलात्कार झाल्यासारखं वाटायचं,’ असं विधान सलमानने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं.