ऐसा दाव मारो की जिंदगी चीत हो जाए, 'सुलतान'चा पॉवरपॅक्ड ट्रेलर लॉन्च
एबीपी माझा वेब टीम | 24 May 2016 02:57 PM (IST)
मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या बहुप्रतीक्षित 'सुलतान' सिनेमाचा ट्रेलर लॉन्च अखेर झाला आहे. रांगड्या पैलवानाच्या लूकमध्ये असलेल्या सलमानची भारदस्त भूमिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच 'सुलतान'चा ट्रेलरही तितकाच प्रभावी बनवण्यात आला आहे. सलमानसोबत अनुष्का शर्माही ट्रेलरमधून पैलवानाच्या भूमिकेत असल्याचं दिसून येते आहे. ट्रेलर लाँच झाल्यानंतर काही तासांतच 14 लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सुलतान’ सिनेमात सलमान खान एका हरियाणाच्या कुस्तीपटूच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहे. आदित्य चोप्राने चित्रपटाची निर्मिती केली असून पटकथा लेखन आणि दिग्दर्शन अली अब्बास जफरने केलं आहे. यंदा ईदला ‘सुलतान’ प्रदर्शित होणार आहे. पाहा ट्रेलर: