मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ सिल्व्हर स्क्रीनवर भलेही त्याच्या स्टंट्सने अनेकांना आवाक् करत असेल. पण खऱ्या आयुष्यात टायगर अगदी विरुद्ध आहे. टायगर आणि त्याची गर्लफ्रेण्ड दिशा पटानी यांच्या प्रेमाची जोरदार चर्चा आहे. पण काही दिवसांपूर्वी टायगर गर्लफ्रेण्डला हॉटेलमध्ये एकटं सोडून पळून गेला होता.


 

 

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी शुक्रवारी डिनर डेटवर गेले होते. त्यानंतर वांद्र्याच्या एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये दोघे पोहोचले. पण टायगर आल्याचं समजल्यानंतर चाहते या रेस्टॉरंटबाहेर जमा झाले. यानंतर मीडियाचे प्रतिनिधीही तिथे दाखल झाले. हे सगळं पाहिल्यानंतर टायगर भांबावला आणि गाडीत बसून त्याने तिथून पळ काढला.

 

 

परंतु दिशा पटानी रेस्टॉरंटमध्ये एकटीच राहिली. ती आत टायगरची वाट पाहत होती. पण बराच वेळ टायगर न आल्याने तिनेही रेस्टॉरंटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यावेळी तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. यानंतर दिशानेही ऑटोरिक्षामधून घर गाठलं.