सलमानचा शेरा आता जस्टिन बीबरचा बॉडीगार्ड!
एबीपी माझा वेब टीम | 06 May 2017 07:44 AM (IST)
मुंबई : भारतीय चाहते प्रसिद्ध पॉप सिंगर जस्टिन बीबरची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. जस्टिन बीबरच्या भारत दौऱ्यासाठी खास व्यवस्थाही करण्यात येत आहे. पर्पज टूरसाठी भारतात येणाऱ्या जस्टिन बीबरच्या सुरक्षेची जबाबदारी, सलमान खानचा बॉडीगार्ड शेरावर सोपवण्यात आली आहे. कॅनडाचा पॉप सिंगर 7 मे रोजी दुबईहून मुंबईला 7 मे रोजी येत आहे. तर 10 मे रोजी त्याचा नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये त्याचा कॉन्सर्ट होणार आहे. कॉन्सर्टमध्ये जस्टिनच्या सुरक्षेची काळजी मी स्वत: घेईन असं शेराने सांगितलं. 2 फाईव्ह स्टार हॉटेल, 1 हेलिकॉप्टर, जस्टिन बिबरच्या मागण्यांची यादी शेराचं खरं नाव गुरमीत सिंह जॉली आहे. तो 20 वर्षांपासून सलमान खानचा विश्वासू बॉडीगार्ड आहे. भारत दौऱ्यादरम्यान बीबरच्या सुरक्षाव्यवस्थेची काळजी शेरा घेणार आहे. शेरा आपल्या टायगर सिक्युरिटीसोबत हे काम करणार आहे. एखाद्या हॉलिवूड सेलिब्रिटीच्या सुरक्षेसाठी शेराची निवड होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी शेरा आणि त्याच्या कंपनीने विल स्मिथ, जॅकी चॅन या अभिनेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी योग्यरित्या पार पाडली होती. जस्टिन बीबर 120 साथीदारांसह फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दाखल होईल. त्याच्या सेवेसाठी 10 लक्झरी सिडानसह दोन व्होल्वो बस कायम असतील.