सलमानच्या ‘ट्युबलाईट’चा टीझर तुफान व्हायरल
एबीपी माझा वेब टीम | 05 May 2017 07:46 PM (IST)
मुंबई : सुपरस्टार सलमान खानच्या बहुप्रतीक्षित ‘ट्युबलाईट’ सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अवघ्या 24 तासात ‘ट्युबलाईट’च्या टीझरने 60 लाख व्हूचा टप्पा पार केला असून, ट्विटर आणि फेसबुक पेजवरुनही मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला आहे. यू ट्यूबवर ‘ट्युबलाईट’चा टीझर 60 लाखांहून अधिक वेळा, तर सलमान खानच्या वैयक्तिक फेसबुक पेजवरुन 70 लाखांहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. काल ‘ट्युबलाईट’चा टीझर रिलीज झाला. 1962 च्या भारत-चीन युद्धावर आधारित या सिनेमाची कथा आहे. या सिनेमात सलमान खानची भूमिका अत्यंत साध्या-सरळ तरुणाची असेल, असं टीझरवरुन लक्षात येतं. सोहेल खानही एका सीनमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसतो आणि त्याला मिठी मारुन सलमान रडतो आहे, असाही एक सीन आहे. त्यामुळे सिनेमात भावनिकरित्या कथा हाताळली असल्याचे टीझरवरुन लक्षात येते. ‘ट्युबलाईट’मध्ये सलमान खान, सोहेल खान आणि चायनिज अभिनेत्री झू झू मुख्य भूमिकेत आहेत. सलमा खान आणि सलमान खान यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. सलमानच्या आधीच्या सुपर-डुपरहिट सिनेमाचं दिग्दर्शन केलेला दिग्दर्शक कबीर खानने ‘ट्युबलाईट’चंही दिग्दर्शन केले आहे. कबीर खान आणि सलमान खान या जोडगोळीचा हा तिसरा सिनेमा आहे. यंदा ईदच्या दिवशी सलमानचा ट्युबलाईट’ सिनेमा रिलीज होणार आहे. पाहा ‘ट्युबलाईट’चा टीझर :