नवी दिल्ली : बॉलिवूडचा दबंग अर्थात सलमान खानचा मोस्ट अवेटेड सिनेमा ‘ट्युबलाईट’चा टीझर रिलीज झाला आहे. 1962 च्या भारत-चीन युद्धावर आधारित या सिनेमाची कथा आहे.


या सिनेमात सलमान खानची भूमिका अत्यंत साध्या-सरळ तरुणाची असेल, असं टीझरवरुन लक्षात येतं. सोहेल खानही एका सीनमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसतो आणि त्याला मिठी मारुन सलमान रडतो आहे, असाही एक सीन आहे. त्यामुळे सिनेमात भावनिकरित्या कथा हाताळली असल्याचे टीझरवरुन लक्षात येते.

‘ट्युबलाईट’मध्ये सलमान खान, सोहेल खान आणि चायनिज अभिनेत्री झू झू मुख्य भूमिकेत आहेत. सलमा खान आणि सलमान खान यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.

सलमानच्या आधीच्या सुपर-डुपरहिट सिनेमाचं दिग्दर्शन केलेला दिग्दर्शक कबीर खानने ‘ट्युबलाईट’चंही दिग्दर्शन केले आहे. कबीर खान आणि सलमान खान या जोडगोळीचा हा तिसरा सिनेमा आहे.

यंदा ईदच्या दिवशी सलमानचा ट्युबलाईट’ सिनेमा रिलीज होणार आहे.

पाहा टीझर :