मुंबई : घोड्यासोबत शर्यत लावली तर माणूस जिंकेल की घोडा? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 'घोडा' असंच द्याल. परंतु बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने तुमचा अंदाज खोटा ठरवला आहे.


सलमान खान वर्कआऊट करताना वेगवेगळ्या गोष्टी करण्यावर भर देतो. यातूनच घोड्यासोबत शर्यत लावण्याची कल्पकता त्याच्या डोक्यात आली.

सर्वात वाईट अभिनेता कोण ; गुगल म्हणतं सलमान खान


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सलमान घोड्यासोबत रेस लावताना दिसत आहे. घोडा फिनिशींग लाईन पार करण्याच्या काही क्षण आधी सलमान अंतिम रेषेला पोहचला. म्हणजेच सलमानने ही रेस जिंकली.

संजू सिनेमावरील सलमानच्या कमेंटला रणबीर कपूरचं उत्तर


हा व्हिडिओ कधी शूट करण्यात आला, याची माहिती उपलब्ध नाही. सलमानने अनेक चित्रपटांमध्ये घोडेस्वारी केली आहे. व्हिडिओमध्ये बॅकग्राऊण्डला 'सुलतान' सिनेमातलं गाणं लागलं आहे, मात्र सलमानचा लूक पाहता हा वेगळ्या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळचा व्हिडिओ असावा, असा कयास आहे.

'रेस 3' आवडला का? पहिला शो पाहिलेले प्रेक्षक म्हणतात...


 


नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रेस 3' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. पाच दिवसात चित्रपटाने 132.76 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तीनच दिवसात म्हणजे वीकेंडलाच 'रेस 3' ने 100 कोटींचा आकडा पार केला. पहिल्या दिवशी 29.17 कोटी कमवत 'रेस 3' 2018 मधला सर्वाधिक ओपनिंग मिळालेला चित्रपट ठरला आहे.