मुंबई : बलात्कार पीडित विधानावर अभिनेता सलमान खानने महाराष्ट्र महिला आयोगाला लेखी उत्तर पाठवलं आहे. महिला आयोगाच्या नोटीसला सलमान खानने कालच (बुधवार) उत्तर पाठवलं. त्यावर कालच सुनावणी झाली. आता महिला आयोगाने हे पत्र लीगल टीमकडे पाठवलं असून पुढील कारवाई हिच टीम करेल.


 

आता मला थोडं कमी बोललं पाहिजे: सलमान खान


 

सलमान खानचं वादग्रस्त वक्तव्य

‘सुलतान’ चित्रपटाच्या शुटिंगनंतर आपल्याला बलात्कार पीडितेसारखं वाटत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य सलमान खानने केलं होतं. ‘दररोज 120 किलो वजनाच्या माणसाला 10 वेगवेगळ्या अँगलमधून 10 वेळा उचलावं लागत होतं. दररोज सहा तास ही कसरत केल्यानंतर मला धड चालताही येत नव्हतं. कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर पडताना मला बलात्कार झाल्यासारखं वाटायचं’   असं वादग्रस्तव वक्तव्य त्यानं केलं होतं.

 

सुलतान’च्या शूटिंगनंतर बलात्कार पीडितेसारखं वाटायचं : सलमान


 

आज हजर न राहिल्यास सलमानवर कारवाई

यानंतर महिला आयोगाने नोटीस पाठवून सलमानला स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला होता. सलमानने 29 तारखेला वकिलांमार्फत आयोगाला उत्तर पाठवलं, मात्र माफी मागितली नाही. त्यानंतर सलमान पुन्हा 7 जुलै रोजी हजर राहण्याचा आदेश महिला आयोगाने दिला होता. मात्र यावेळी ना सलमान हजर राहिला, ना त्याचे वती. त्यामुळे आयोगाने त्याला तिसरा आणि शेवटचा समन्स पाठवला. जर सलमान 14 जुलै म्हणजे आजही हजर राहिल नाही तर आयोग त्याच्याविरोधात कारवाई करण्याची शक्यता आहे.

 

संबंधित बातम्या

सलमानचं विधान दुर्दैवी आणि असंवेदनशील : आमीर खान


सलमानच्या ‘बलात्कार पीडित’ विधानावर सलीम खान यांचा माफीनामा

महिला आयोगाच्या नोटीसला सलमानचं उत्तर, मात्र माफी नाहीच