Salman Khan Throwback Video: ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याचा काडीमोड (Aishwarya-Abhishek Divorce Rumours) झाला की, काय? अशा चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय. दोघांमध्ये दुरावा आला असून घटस्फोटाच्या अफवांमुळे सर्वांचं लक्ष बॉलिवूडच्या (Bollywood) मोस्ट फेवरेट कपलवर खिळलं आहे. इव्हेंट्स आणि फंक्शन्समध्ये दोघेही एकमेकांसोबत न दिसता, अनेकदा एक-एकटेच दिसतात. या अफवांवर दोघांकडूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, यादरम्यान सलमान खानचा (Salman Khan) एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहे. 2002 मध्ये सलमान आणि ऐश्वर्याचं ब्रेकअप झाल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर ऐश्वर्यानं अभिषेक बच्चनसोबत आपली लग्नगाठ बांधली होती. दोघांच्या लग्नानंतर सलमान खाननं त्यावर भाष्य केलं होतं. सध्या हाच जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  


"मी तिच्याबद्दल काय बोलू...?"; सलमानचे डोळे पाणावले 


सलमान आणि ऐश्वर्यानं एकमेकांना बरेच दिवस डेट केलं होतं, हे सर्वश्रुत आहेच. पण त्यांचं नातं लग्नाच्या बंधनाच अडकलं नव्हतं. आजवर दोघेही त्यांच्या डेटिंग लाईफबाबत कधीच उघडपणे बोललेले नाहीत. पण, सलमाननं एकदा एका शोदरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाबद्दल भाष्य केलं होतं. सलमान खाननं 'आप की अदालत'या कार्यक्रमाच्या कोर्टात मुलाखत दिली होती. या शो दरम्यान, जेव्हा सलमानला ऐश्वर्यावरील गैरवर्तनाच्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं, त्यावेळी तो म्हणाला होता की, "सर, मी तिच्याबद्दल काय बोलू? प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य असतं..."






पुढे बोलताना सलमान म्हणाला की, "याला लोकांसमोर चर्चेचा विषय बनवू नये. जर मी स्वतः स्पष्टीकरण देऊ लागलो, तर असं वाटेल की, कधीकाळी माझ्या आयुष्याचा भाग असलेल्या व्यक्तिला मी नाकारत आहे. त्यामुळे या विषयावर मला फार काही बोलायचं नाही." सलमाननं अतिशय साधेपणानं आपलं मत मांडलं होतं. त्यानं ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाबद्दल बोलताना दोघांचंही कौतुकही केलं. सलमान म्हणाला की, शांत राहणं ही सर्वात चांगली गोष्ट आहे. इतकी वर्षे उलटून गेली... आणि ऐश्वर्या आता कोणाची तरी पत्नी आहे आणि एका मोठ्या कुटुंबाचा भाग आहे... तिनं अभिषेकसोबत लग्न केल्याचा मला खूप आनंद आहे. मला वाटतं की, अभिषेक एक उत्तम व्यक्ती आहे. ही सर्वात चांगली गोष्ट आहे, जी कोणत्याही एक्स पार्टनरला हवी असेल."


"ती व्यक्ती तुमच्याशिवाय दुःखी व्हावी..." 


सलमान पुढे बोलताना म्हणाला की, "जर एखाद्या व्यक्तीसोबतची तुमची मैत्री संपली तर, ती व्यक्ती तुमच्याशिवाय दुःखी व्हावी, असं तुम्हाला अजिबात आवडणार नाही. तुम्हाला असंच वाटेल की, त्या व्यक्तिनं तुमच्याशिवाय खूप खूश राहावं. यामागे तुमचा स्वार्थही असू शकतो की, तुमच्या डोक्यावर त्या नात्याबाबत कोणतंच गिल्ट असू शकत नाही, पण, हे पाहण्याची सर्वात उत्तम पद्धत हीच आहे, असं मला वाटतं." 


व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 


विशेष बाब म्हणजे, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या वैवाहिक जीवनातील समस्यांबाबत, त्यांच्या घटस्फोटाबाबत अफवा पसरल्या असताना हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्यात दोघेही स्वतंत्रपणे पोहोचले होते, तेव्हा या अफवांनी जोर धरला होता. त्यानंतर अभिषेकनं ऐश्वर्याला तिच्या वाढदिवसाच्या सोशल मीडियावर शुभेच्छाही दिल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


सुजलेले डोळे, हाताला दुखापत... त्याच अवस्थेत अवॉर्ड घेण्यासाठी स्टेजवर पोहोचलेली ऐश्वर्या राय; अवस्था पाहून हादरुन गेलेले चाहते, नेमकं काय घडलेल?