Bell Bottom : अक्षय कुमार स्टारर स्पाय थ्रिलर सिनेमा बेल बॉटम लवकरच अॅमेझॉन प्राईमवर पाहता येणार आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने रविवारी माहिती दिली की अक्षय कुमार स्टारर स्पाय थ्रिलर फिल्म बेल बॉटमचा प्रीमियर स्ट्रीम केला जाईल. भारतासह इतर देशांमध्ये उपस्थित असलेले प्राईम मेंबर्स 16 सप्टेंबर 2021 पासून अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर हा चित्रपट पाहू शकतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणजीत एम तिवारी यांनी केले आहे. अक्षय कुमार, वाणी कपूर, हुमा कुरेशी, लारा दत्ता, आदिल हुसेन आणि अनिरुद्ध दवे यांच्यासह अनेक स्टार्स या चित्रपटात दिसत आहेत.


अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ (इंडिया) चे संचालक आणि प्रमुख (कंटेन्ट) विजय सुब्रमण्यम म्हणाले की, आमच्या प्रेक्षकांना अॅक्शन आणि थ्रिलर कथा आवडतात. त्यांना बेल बॉटम सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या चित्रपटाला आमच्या प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे आणि आम्ही त्याची कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहोत. एक मनोरंजक पटकथा आणि उत्तम अभिनयाने सजलेला हा चित्रपट आमच्या कंटेन्ट लायब्ररीतील रत्न आहे.



चित्रपटाचे दिग्दर्शक रंजीत एम तिवारी म्हणाले की, चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडिओच्या माध्यमातून जागभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे याचा मला खूप आनंद आहे. चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांनी त्यांचे रोल उत्तम प्रकारे साकारले आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल अशी आशा आहे. निर्माते जॅकी भगनानी म्हणाले की, रणजीत एम तिवारी आणि संपूर्ण कलाकार आणि क्रूने ब्लॉकबस्टर चित्रपट बनवण्यासाठी मेहनत घेतली आहे. सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होतोय याचा मला आनंद आहे. 


लॉकडाऊनमध्येच सिनेमाचं शूटिंग पूर्ण


'बेल बॉटम' चित्रपटाची शुटींग संदर्भात एक खास गोष्ट म्हणजे की, लॉकडाऊनमध्ये शुटींग सुरु करण्यात आली. तसेच संपूर्ण शुटींग जवळपास एक ते दीड महिन्यांतच पूर्ण झाली. अक्षय कुमार स्टारर हा चित्रपट डिटेक्टिव्ह फिल्म आहे. या चित्रपटाची पटकथा 80च्या दशकातील आहे. चित्रपटात अक्षय एका सीक्रेट एजंटची भूमिका साकारली आहे.