मुंबई : सुपरस्टार सलमान खान कायमच स्टारकिड्स किंवा नवोदित अभिनेत्यांना बॉलिवूडमध्ये लाँच करत आला आहे. पुलकित सम्राट, सुरज पांचोली, आथिया शेट्टी, झरीन खान अशी यादी मोठी आहे. सलमानची बहीण अर्पिता खानचा नवरा 'लव्हरात्री'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.


सलमान त्याचा मेहुणा आयुष शर्माला बॉलिवूडमध्ये लाँच करत आहे. सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सलमान आयुषसोबत सिनेमा करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र सलमानच्या ट्वीटमुळे यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

लव्हरात्री हा सलमान खान फिल्म्सचा पाचवा चित्रपट आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिराज मिनावाला करत आहे. अभिराजचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. यापूर्वी त्याने फॅन, गुंडे, जब तक है जान, गुंडे यासारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे.

https://twitter.com/BeingSalmanKhan/status/941208648059035648

आयुषसोबत कोणती अभिनेत्री झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सिनेमाचं शूटिंग सुरु होणार असून 2018 च्या अखेरी 'लव्हरात्री' प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/aaysharma/status/941209062619746306

सलमान सध्या कतरिना कैफसोबतच्या आगामी 'टायगर जिंदा है' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

सलमानची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांचं 2014 मध्ये लग्न झालं होतं. त्यांना अहिल हा मुलगा आहे.