Premier Of Film Tadap : तडप या चित्रपटाचा नुकताच प्रीमियर पार पडला. या प्रीमियरला बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्मा यांनी हजेरी लावली होती. अभिनेता सुनिल शेट्टीचा(Sunil Shetty) मुलगा अहान शेट्टी (Ahan Shetty) तडप या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अनेक सिलिब्रीटींनी तडप या चित्रपटाच्या प्रीमियरला हजेरी लावून अहानला त्याच्या या पहिल्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. 


बॉलिवूड सेलिब्रेटींसोबतच एल. राहुल, रॉबिन उथप्पा,  हार्दिक पंडया, क्रुणाल पंडया आणि  इरफान पठान हे क्रिकेटर देखील तडप चित्रपटाच्या प्रीमियरला आले होते. मौनी रॉय, रोनित रॉय, बख्तियार ईरानी, गौतम गुलाटी, विंदु आणि पायल रोहतगी हे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कालाकार देखील तडप चित्रपटाच्या  प्रीमियरला उपस्थित होते. 


अर्जुन रामपाल , रितेश देशमुख,  जिनेलिया डिसूजा, जॅकी श्रॉफ, समीरा रेड्डी, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूजा यांनी प्रीमियरला हजेरी लावून अहानला शुभेच्छा दिल्या.





काही दिवसांपूर्वी अहानच्या 'तडप' या चित्रपटाचा टीझर  रिलीज झाला. हा टीझर प्रदर्शित करून चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट देखील घोषित केली होती.  तडप चित्रपटामध्ये अहान शेट्टीसोबत अभिनेत्री तारा सुतारिया प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लूथरिया यांनी केले आहे. हा चित्रपट 3 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.


संबंधित बातम्या


Katrina Kaif And Vicky Kaushal wedding : 'मी जाणार नाही' ; विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल असं का म्हणाले गजराज राव?


TRP Report : बड्या पडद्यावरचे सुपरस्टार छोट्या पडद्यावर फेल! अमिताभ, सलमान, रणवीरचा एकही शो टॉप टेनमध्ये नाही